Team India Will Come To Pakistan says Rashid Latif : बीसीसीआयचे सचिव जय शाह यांची आयसीसीच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड करण्यात आली आहे. ते १ डिसेंबरपासून आयसीसीचे अध्यक्षपद स्वीकारणार आहेत. ही बातमी येताच चॅम्पियन्स ट्रॉफीबाबत पाकिस्तानच्या अपेक्षा वाढल्या आहेत. याप्रकरणी पाकिस्तानच्या माजी क्रिकेटपटूने भारत पाकिस्तानात येणार असल्याची हमी दिली आहे. जवळपास तीन दशकांनंतर पहिल्यांदाच घरच्या भूमीवर आयसीसी स्पर्धा आयोजित करण्यासाठी पाकिस्तान उत्सुक आहे. पण भारतीय संघ पाकिस्तानात जाणार की नाही हा मुद्दा चांगलाच तापला आहे.

जय शाह आयसीसीचे अध्यक्ष झाल्याने पाकिस्तानच्या आशा वाढल्या –

बीसीसीआय टीम इंडियाला पाकिस्तानात पाठवू इच्छित नाही, अशा अफवा सर्वत्र पसरल्या आहेत. मीडिया रिपोर्ट्सनुसार, भारताला आपले सामने तटस्थ ठिकाणी खेळायचे आहेत. बीसीसीआयचे सचिव जय शाह यांची आयसीसीचे नवे अध्यक्ष म्हणून बिनविरोध निवड करण्यात आली. त्यानंतर भारतीय संघ कोणत्याही परिस्थितीत पाकिस्तानचा दौरा करणार नसल्याचा अंदाज अनेक चाहत्यांनी बांधला आहे. पण दुसरीकडे यानंतर पाकिस्तानच्या अपेक्षा दुपटीने वाढल्या आहेत. याचे कारण पाकिस्तानचा माजी कर्णधार रशीद लतीफने सविस्तरपणे सांगितले आहे.

Eknath Shinde On Sharad Pawar
Eknath Shinde : शरद पवार-एकनाथ शिंदे संपर्कात आहेत का? मलिकांच्या ‘त्या’ विधानावर मुख्यमंत्र्यांचं भाष्य; म्हणाले, “दुसरा विचार…”
Manoj Jarange Patil on Kalicharan
‘हिंदुत्व तोडणारा राक्षस’, कालीचरण यांच्या विधानानंतर मनोज जरांगे…
Eknath shinde 170 seats mahayuti
विधानसभा निवडणुकीत महायुतीला १७० हून अधिक जागा मिळाल्याशिवाय राहणार नाहीत – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
India Refuses Cricket In Pakistan
पाकिस्तानात चँपियन्स ट्रॉफी खेळण्यासाठी भारताचा नकार का? पाकव्याप्त काश्मीरचा मुद्दा का चर्चेत?
Kal ho naa ho
“तिथे उपस्थित असलेल्या…”, ‘त्या’ सिनेमातील शाहरुख खानच्या मृत्यूच्या सीनबद्दल अभिनेत्रीचा मोठा खुलासा
Those who do not accept Hindu Rashtra should go to Pakistan says Dhirendrakrishna Shastri
हिंदू राष्ट्र मान्य नसणाऱ्यांनी पाकिस्तानात चालते व्हावे, धीरेंद्रकृष्ण शास्त्रींचे वक्तव्य
yogi Adityanath batenge to katenge
‘बटेंगे तो कटेंगे’, ‘एक हैं तो सेफ हैं’, योगी आदित्यनाथ यांची घोषणा
Mohammad Rizwan Says I am only a captain for toss and presentation
Mohammad Rizwan : ‘मी फक्त टॉस आणि प्रेझेंटेशनसाठी कर्णधार…’, ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या ऐतिहासिक विजयानंतर मोहम्मद रिझवानचे मोठे वक्तव्य

रशीद लतीफ काय म्हणाला?

‘कॉट बिहाइंड’ या यूट्यूब चॅनलवर बोलताना रशीद लतीफ म्हणाला, ‘जर जय शाह यांची बिनविरोध निवड झाली असेल, तर याचा अर्थ पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने (पीसीबी) ही पाठिंबा दिला आहे. त्यामुळे मला वाटते की टीम इंडिया पाकिस्तानात न जाण्याच्या घोषणेवर, ते स्वाक्षरी करतील अशी शक्यता नाही. मला वाटते की भारत पाकिस्तानमध्ये येत आहे, हे जवळपास ५०% स्पष्ट आहे.

हेही वाचा – Virat Kohli : ‘एकच विराट आहे…’, स्वत:शी शुबमन गिलची तुलना केल्याने संतापला कोहली; VIDEO व्हायरल झाल्याने खळबळ

टीम इंडियाने पाकिस्तानचा शेवटचा दौरा कधी केला होता?

१९९६ च्या विश्वचषकाचे संयुक्त यजमानपद भूषवल्यापासून पाकिस्तानने आयसीसीच्या मोठ्या स्पर्धेचे आयोजन केलेले नाही. मात्र, त्यांनी २०२३ च्या आशिया चषकाचे आयोजन केले होते. पण टीम इंडिया पाकिस्तानात गेली नाही आणि सामने श्रीलंकेत खेळवले गेले. विशेष म्हणजे टीम इंडियाने २००८ च्या आशिया चषकासाठी शेवटचा पाकिस्तान दौरा केला होता.