टी-२० विश्वचषक २०२२ च्या समाप्ती नंतर टीम इंडियाला न्यूझीलंडचा दौरा करायचा आहे. या दौऱ्यासाठीचा संघ बीसीसीआयने सोमवारी (३१ ऑक्टोबर) जाहीर केला आहे. भारताला न्यूझीलंडविरुद्ध तीन टी-२० आणि तीन एकदिवसीय सामने खेळायचे आहेत. या मालिकेसाठी टीम इंडियाच्या वरिष्ठ खेळाडूंना विश्रांती देण्यात आली आहे, त्यामुळे टी-२० संघाची कमान हार्दिक पांड्याकडे देण्यात आली आहे. त्याचबरोबर वनडे संघाचे कर्णधारपद शिखर धवनकडे सोपवण्यात आले आहे. तसेच दोन्ही संघाच्या उपकर्णधार पदाची जबाबदारी ऋषभ पंतकडे देण्यात आली आहे.
विराट कोहली, रोहित शर्मा, केएल राहुल, दिनेश कार्तिक, रविचंद्रन अश्विन, मोहम्मद शमी यांसारखे वरिष्ठ खेळाडू न्यूझीलंड दौऱ्यासाठी संघाचा भाग नाहीत. म्हणजेच हे सर्व खेळाडू टी-२० विश्वचषक २०२२ नंतर आपापल्या घरी परततील. भारतीय संघ सध्या ऑस्ट्रेलियात आहे आणि टी-२० विश्वचषक खेळत आहे, त्यामुळे न्यूझीलंड ऑस्ट्रेलियाच्या जवळ आहे. त्यामुळे या दौऱ्यानंतरच उर्वरित संघ मायदेशी परतणार आहे. नोव्हेंबरनंतर भारताला डिसेंबरमध्ये बांगलादेशचा दौरा करायचा आहे.
टी-२० मालिकेसाठी टीम इंडिया: हार्दिक पंड्या (कर्णधार), ऋषभ पंत (उपकर्णधार), शुभमन गिल, इशान किशन, दीपक हुडा, सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, संजू सॅमसन (यष्टीरक्षक), वॉशिंग्टन सुंदर, युजवेंद्र चहल, के. यादव, अर्शदीप सिंग, हर्षल पटेल, मोहम्मद सिराज, भुवनेश्वर कुमार, उमरान मलिक.
वनडे मालिकेसाठी टीम इंडिया: शिखर धवन (कर्णधार), ऋषभ पंत (उपकर्णधार), शुभमन गिल, दीपक हुडा, सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, संजू सॅमसन (यष्टिरक्षक), वॉशिंग्टन सुंदर, शार्दुल ठाकूर, शाहबाज अहमद, युजवेंद्र चहल, कुलदीप यादव, अर्शदीप सिंग, दीपक चहर, कुलदीप सेन, उमरान मलिक.
भारत आणि न्यूझीलंड मालिकेचे वेळापत्रक –
१८ नोव्हेंबर, शुक्रवार: पहिला टी-२०, वेलिंग्टन
२० नोव्हेंबर, रविवार: दुसरा टी-२०, माउंट मौनगानुई
२२ नोव्हेंबर, मंगळवार: तिसरा टी-२०, ऑकलंड
२५ नोव्हेंबर, शुक्रवार: पहिला वनडे, ऑकलंड
२७ नोव्हेंबर, रविवार: दुसरी वनडे, हॅमिल्टन
३० नोव्हेंबर, बुधवार: तिसरी वनडे, क्राइस्टचर्च