Asia Cup 2023 Latest News Update : एसीसीने पाकिस्तानचा हायब्रिड मॉडेलचा प्रस्ताव स्वीकारल्याने भारताचा माजी फलंदाज आकाश चोप्राला दिलासा मिळाला आहे. भारताने पाकिस्तानात जाण्यासाठी नकार दिला होता आणि ते जाणार नाहीयेत, याबाबत मला आश्चर्य वाटलं नाही. पाकिस्तानही विश्वकप खेळण्यासाठी येणार आहे. यामध्ये काहीच शंका नाहीय कारण आप आयसीसीच्या टूर्नामेंटमध्ये असं करू शकत नाहीत, जे तुम्ही करणार नाही. पाकिस्तानशिवाय आशिया कप ‘बिना टॉपिंग के पिज्जा’ सारखा आहे, अशी प्रतिक्रिया चोप्राने त्यांच्या यू ट्यूब चॅनेलवर दिली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

” तुम्ही आशिया कपमध्ये स्वत:ला फ्लेक्स करू शकता. तुम्ही म्हणू शकता की, तुम्ही खेळू शकत नाही आणि अन्य संघ तुमच्याशिवाय खेळू शकतात. पाकिस्तानशिवाय आशिया कप ‘टॉपिंग के बिना पिज्जा’सारखं आहे. ही आनंदाची गोष्ट नाही. म्हणून तुम्हाला वाटतं की एशिया कप पाकिस्तानात होऊदे.”

नक्की वाचा – जंगलात दिसला दुर्मिळ प्राणी, IFS अधिकाऱ्याने विचारलं नाव, बरोबर उत्तर सांगणाऱ्याला मिळणार ‘हे’ बक्षिस

‘असा’ आहे टूर्नामेंटचा फॉर्मेट

या टूर्नामेंटमध्ये सहभाग घेणारे सर्व सहा संघांना दोन ग्रुपमध्ये विभागलं आहे. प्रत्येक ग्रुपमधून दोन संघ सुपर फोअर राऊंडमध्ये पोहोचतील आणि सुपर फोअर राऊंडमध्ये अव्वल स्थानावर राहणाऱ्या दोन्ही संघांमध्ये फायनल सामना खेळवला जाईल. आयोजित करणाऱ्या १३ सामन्यांपैकी चार सामने पाकिस्तान आणि इतर ९ सामने श्रीलंकामध्ये खेळवण्यात येतील. आशिया कपचा आयोजन ३१ ऑगस्टपासून १७ डिसेंबरच्या मध्ये होईल. याबाबत सविस्तर शेड्युलची घोषणा लवकरच करण्यात येईल.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Team india former batter akash chopra saying pakistan cricket team participation in asia cup 2023 like pizza without topping nss