ऑस्ट्रेलियाविरूद्ध भारतीय संघ सिडनी येथे तिसरी कसोटी खेळत आहे. ७ ते ११ जानेवारी दरम्यान ही कसोटी खेळवण्यात येत आहे. त्यानंतर दौऱ्यातील शेवटची कसोटी ब्रिस्बेनच्या मैदानावर खेळवण्यात येणार आहे. या कसोटीआधी स्थानिक नियमांनुसार भारतीय संघाला क्वारंटाइन राहण्याबाबत तेथील प्रशासन आग्रही आहे. पण भारतीय संघ केवळ दौऱ्याच्या सुरूवातीच्या काळातच क्वारंटाइन राहिल असं बीसीसीआयकडून स्पष्ट करण्यात आलं होते. त्यामुळे पुन्हा क्वारंटाइनचा प्रश्नच उद्भवत नाही असं बीसीसीआयकडून सांगितलं जात आहे. मात्र ऑस्ट्रेलियन प्रसारमाध्यमे याबद्दल भारतीय संघाला दोषी ठरवत असल्याने भारताचा माजी खेळाडू चांगलाच भडकला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

“इतर कोणत्याही यष्टीरक्षकापेक्षा ऋषभ पंत…”; पॉन्टींगचं महत्त्वाचं विधान

भारताचा माजी क्रिकेटपटू आकाश चोप्रा याने ऑस्ट्रेलियन मीडियावर सडकून टीका केली. “ऑस्ट्रेलियन मीडिया संघातील १२व्या खेळाडूची भूमिका बजावत आहे. ते भारतीय संघाची वाईट प्रतिमा निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. भारतीय संघ ऑस्ट्रेलियन संघाला घाबरतो असा आभास निर्माण करण्याचा त्यांचा प्रयत्न सुरू आहे. गेल्या वर्षीदेखील अशाच प्रकारचा प्रयत्न करण्यात आला होता. प्रतिस्पर्धी संघाचं मानसिक खच्चीकरण करणं हाच त्यांचा प्रयत्न असतो”, अशी टीका आकाश चोप्राने केली.

Video: झेल टिपण्यासाठी ऋषभ पंतने घेतली हवेत उडी अन्…

“गेल्या वर्षी अॅडलेड कसोटीत भारतीय संघ जिंकला होता. त्यानंतर ऑस्ट्रेलियन प्रशिक्षक जस्टीन लँगर याने भारतीय संघ हा टवाळखोर मुलांचा संघ असल्याचे म्हटले होते. त्यावेळी मलाच आश्चर्य वाटलं होतं की एक टवाळखोर दुसऱ्याला त्याच शब्दाने कसं काय हाक मारू शकतो? त्यानंतर पर्थवरील कसोटी ऑस्ट्रेलियाने जिंकली. तेव्हा भारताला पर्थवर जिंकता येत नाही अशी बातमी ऑस्ट्रेलियन मीडियाने चालवली. आता चौथ्या कसोटीआधी हेच सुरू आहे. ब्रिस्बेनच्या गाबावर भारतीय संघाला खेळता येत नाही, भारतीय संघ ऑस्ट्रेलियाला घाबरतो अशा वावड्या उठवल्या जात आहेत. पण जर प्रत्येक खेळाडूचा नीट अभ्यास केला, तर स्टीव्ह स्मिथ वगळता इतर कोणताही खेळाडू भारतीय संघावर भारी पडू शकत नाही”, असे स्पष्ट मत आकाश चोप्राने व्यक्त केले.