नवा हंगाम आणि काही दिवसांवर येऊन ठेपलेला विश्वचषक पाहता भारतीय क्रिकेट संघाचे प्रायोजक असलेल्या ‘नायके’ या कंपनीने नवीन गणवेशाचे अनावरण केले. भारतीय संघाचा गणवेश सरासरी ३३ प्लॅस्टिक बाटल्यांवर प्रक्रिया करून बनवण्यात आले आहेत.
‘‘नवीन गणवेश हा वजनाने अधिक हलका आहे. २०१५ हे भारतीय क्रिकेटसाठी फार मोठे आहे. विश्वचषक येत्या काही दिवसांवर येऊन ठेपला असून त्यामध्ये आम्ही हा नवीन गणवेश परिधान करून उतरणार आहोत. भारतीय क्रिकेटमध्ये असलेले प्रेम हे या गणवेशामधून दिसते आहे. हा गणवेश परिधान करणे प्रत्येक खेळाडूसाठी अभिमानाची गोष्ट असेल, ’’ असे भारताचा कर्णधार महेंद्रसिंग धोनी म्हणाला.

Story img Loader