ICC World Cup 2023: आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) मंगळवारी क्रिकेटचा देव आणि भारताचा महान खेळाडू सचिन तेंडुलकरची अहमदाबाद येथे ५ ऑक्टोबरपासून सुरू होणाऱ्या एकदिवसीय क्रिकेट विश्वचषक स्पर्धेसाठी ग्लोबल अ‍ॅम्बेसेडरपदी म्हणून नियुक्ती केली आहे. सचिन तेंडुलकरने एकदिवसीय विश्वचषकात सहा वेळा सहभाग घेतला आहे. सचिन पहिल्यांदा १९९२ मध्ये विश्वचषक खेळला होता. तो शेवटचा २०११च्या विश्वचषकात दिसला होता, जेव्हा भारतीय संघाने दुसऱ्यांदा विजेतेपद पटकावले होते.

सचिन विश्वचषक सुरू झाल्याची घोषणा करेल

गुरुवारी इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्यातील सलामीच्या सामन्यापूर्वी सचिन तेंडुलकर विश्वचषक ट्रॉफीसह मैदानात उतरेल आणि स्पर्धेचे उद्घाटन झाले असे घोषित करेल. मास्टर-ब्लास्टर सचिन तेंडुलकरने एका प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे की, “१९८७ मध्ये बॉल बॉय बनण्यापासून ते सहा स्पर्धांमध्ये देशाचे प्रतिनिधित्व करण्यापर्यंत विश्वचषकाचे माझ्या हृदयात नेहमीच विशेष स्थान राहिले आहे. २०११ मध्ये विश्वचषक जिंकणे हा माझ्या क्रिकेट कारकिर्दीतील सर्वात अभिमानास्पद क्षण होता.

IPL Auction Who is Vaibhav Suryavanshi 13 Year Old Batter Becomes Youngest Player in IPL 2025 Mega Auction 2025 List
IPL 2025 Auction: कोण आहे वैभव सूर्यवंशी? आयपीएल लिलावात उतरणार फक्त १३ वर्षांचा भारतीय खेळाडू, ऑस्ट्रेलियाविरूद्ध झळकावलंय जलद शतक
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
maharashtra vidhan sabha election 2024 sudhir mungantiwar vs santosh singh Rawat Ballarpur Assembly constituency
लक्षवेधी लढत : मुनगंटीवार यांच्यासमोर कडवे आव्हान
Dr Sachin Pavde become X factor against MLA Dr Pankaj Bhoir and Shekhar Shende
डॉ. सचिन पावडे ठरताहेत ‘ एक्स ‘ फॅक्टर, आघाडी व युतीस धास्ती.
Rights and Duties of the Opposition in democracy
चतु:सूत्र : लोकशाहीत विरोधी पक्षाची गरज
Afghanistan Batter Rahmanullah Gurbaj Surpasses Virat Kohli in Youngest to 8 Hundreds in Mens ODI Equals Sachin Tendulkar Record
AFG vs BAN: अफगाणिस्तानच्या फलंदाजाची ऐतिहासिक कामगिरी, विराट कोहलीला मागे टाकलं तर सचिन तेंडुलकरच्या विक्रमाची केली बरोबरी
Pankaja Munde At Rally In Parali Beed.
“डोळ्यांसमोर कमळ येईल, पण तुम्ही घड्याळाचेच बटन दाबा…” धनंजय मुंडेंच्या समोरच काय म्हणाल्या पंकजा? पाहा व्हिडिओ

हेही वाचा: Asian Games 2023: शेतकऱ्याच्या लेकीनं चीन मध्ये फडकवला तिरंगा, पारुलने दोन दिवसांत दोन पदकं जिंकत लिहिला ‘सुवर्ण’ इतिहास

युवा खेळाडूंना प्रेरणा मिळेल- सचिन तेंडुलकर

सचिन तेंडुलकर म्हणतो की विश्वचषकासारख्या स्पर्धा युवा खेळाडूंना खूप प्रेरणा देतील. तो म्हणाला, “भारतात होणार्‍या विश्वचषक स्पर्धेत अनेक मातब्बर संघ आणि खेळाडू जोरदार मुकाबला करण्यासाठी सज्ज आहेत. मी या अप्रतिम स्पर्धेची आतुरतेने वाट पाहत आहे. विश्वचषकासारख्या मोठ्या स्पर्धा युवा खेळाडूंना प्रेरणा देतात. मला आशा आहे की, यावेळी ही स्पर्धा तरुण मुला-मुलींना खेळात सहभागी होण्यासाठी आणि त्यांना भारताचे मोठ्या स्तरावर प्रतिनिधित्व करण्यास प्रेरित करेल.”

हेही वाचा: Asian Games 2023: बजरंग पुनियासाठी पदकाचा मार्ग झाला खडतर, कुस्तीचे सामने ग्रीको-रोमन प्रकाराने होणार सुरू

विश्वचषकातील सर्वात यशस्वी फलंदाज

सचिन तेंडुलकरने वयाच्या १९व्या वर्षी पहिला विश्वचषक खेळला होता. जेव्हा त्याने क्रिकेटमधून निवृत्ती घेतली तेव्हा तो विश्वचषकात सर्वाधिक धावा करणारा खेळाडू होता. विश्वचषक स्पर्धेत २००० हून अधिक धावा करणारा सचिन हा एकमेव फलंदाज आहे. एकाच विश्वचषकात सर्वाधिक ६६३ धावा करण्याचा विक्रमही सचिनच्या नावावर आहे.

माहितीसाठी की, वर्ल्ड कपचा पहिला सामना न्यूझीलंड आणि इंग्लंड यांच्यात अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर होणार आहे. याच्या एक दिवस आधी विश्वचषकाचा उद्घाटन सोहळाही आयोजित केला जाणार आहे. कॅप्टन डे आणि हा सोहळा या स्टेडियममध्ये ४ ऑक्टोबर रोजी होणार आहे. या समारंभात सर्व संघांचे कर्णधारही सहभागी होणार आहेत.