Team India has shared a funny video of Ishan Kishan and Rohit Sharma: टीम इंडिया २० जुलैपासून पोर्ट ऑफ स्पेनमधील क्वीन्स पार्कवर वेस्ट इंडिजविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्याला सुरुवात करणार आहे. त्याआधी बुधवारी भारतीय संघाने जोरदार सराव केला. दुसऱ्या कसोटीपूर्वी टीम इंडियाचा यष्टिरक्षक फलंदाज इशान किशनचा (१८ जुलै) वाढदिवसही साजरा केला. इशानच्या वाढदिवसानिमित्त भारतीय क्रिकेट संघाने इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ पोस्ट केला आहे, ज्यामध्ये कर्णधार रोहित शर्माने इशानकडे गिफ्ट मागितले आहे.

डॉमिनिका येथे सुरू असलेल्या मालिकेतील पहिल्या सामन्यात कसोटी पदार्पण करणारा किशन मंगळवारी १८ जुलै रोजी २५ वर्षांचा झाला. दुस-या कसोटीपूर्वी माध्यमांशी संवाद साधताना, रोहितला विचारले गेले की किशनला वाढदिवसाची भेट देण्याची त्याची काही योजना आहे का? ज्याला त्यांनी अप्रतिम उत्तर दिले. भारतीय कर्णधार युवा कीपर-फलंदाजाकडे वळला आणि गंमतीने विचारले, “क्या बर्थडे प्रेझेंट चाहिये भाई तेरेको?

tarak mehta ka ooltah chashmah fame mandar chandwadkar dance with wife watch video
Video: ‘तारक मेहता…’ मधील भिडे मास्तर पोहोचले पेरुच्या शेतात अन् बायकोबरोबर केला मकरंद अनासपुरेंच्या गाण्यावर जबरदस्त डान्स, पाहा व्हिडीओ
Manoj Jarange Patil on Kalicharan
‘हिंदुत्व तोडणारा राक्षस’, कालीचरण यांच्या विधानानंतर मनोज जरांगे…
Rohit Sharma, Ritika Sajdeh become parents again to a baby boy
Rohit Sharma : रोहित शर्मा झाला पुन्हा बाबा; टीम इंडियानेच केलं शिक्कामोर्तब! तिलक-संजूसह सूर्याने दिल्या खास शुभेच्छा, पाहा VIDEO
Thoda Tuza Ani Thoda Maza fame Sameer Paranjape propose to Shivani surve on aata hou de dhingana season 3
Video: ‘थोडं तुझं आणि थोडं माझं’मधील तेजसने सोलापुरी भाषेत मानसीला केलं प्रपोज, म्हणाला, “बार्शी तिथं सरशी…”
Lakhat Ek Aamcha Dada fame nitish Chavan wishing post for Mahesh Jadhav
Video: “काजू आकाराने छोटा असला तरी त्याचा भाव…”, ‘लाखात एक…’ फेम नितीश चव्हाणने महेश जाधवला वाढदिवसाच्या दिल्या खास शुभेच्छा
Prithvi Shaw Dance Video Viral of his 25th Birthday Party Trolled for Disciplinary Issues in Ranji Trophy
Prithvi Shaw: पृथ्वी शॉचा वाढदिवसाच्या पार्टीत ‘तांबडी चामडी’ गाण्यावर भन्नाट डान्स, सोशल मीडियावर होतोय ट्रोल, VIDEO व्हायरल
Aishwarya avinash narkar in front of old father reaction viral
Video: नारकर जोडप्याचा दाक्षिणात्य गाण्यावर डान्स, लेक अन् जावयाला पाहून ऐश्वर्या यांचे वडील झाले खूश, सर्वत्र होतंय कौतुक
Bigg Boss Marathi Fame Abhijeet Sawant dance on Afghan Jalebi song in bathroom video viral
Video: ‘बिग बॉस मराठी’ फेम अभिजीत सावंतचा बाथरुममध्ये ‘अफगान जलेबी’ गाण्यावर जबरदस्त डान्स, व्हिडीओ होतोय व्हायरल

रोहितने इशान किशनकडूनच मागितले गिफ्ट –

या प्रश्नाचे उत्तर देताना रोहित शर्मा म्हणाला, “भाऊ तुला वाढदिवसाचे कोणते गिफ्ट हवे आहे? तुझ्याकडे सर्व काही आहे. मला संघाला विचारावे लागेल, ते संघाचे योगदान असेल.” त्याच्या विनोदी मूडमध्ये पुढे बोलत तो किशनला म्हणाला, “वाढदिवसाचे गिफ्ट म्हणून तू आम्हाला १०० धावा करून दे भाई”.

रोहितने इशान किशनचे केले कौतुक –

भारतीय कर्णधार रोहित शर्माने यष्टीरक्षक फलंदाज इशान किशनचे कौतुक केले आणि सांगितले की “काही वेळापूर्वी, त्याने एकदिवसीय क्रिकेटमध्ये द्विशतक केले. त्याच्याकडे खेळ आणि प्रतिभा आहे, जी आपल्याला समोर आणायची आहे. त्याला संधींची गरज आहे, तो डावखुरा फलंदाज आहे ज्याला आक्रमक क्रिकेट खेळायला आवडते. त्याने कसे खेळावे याविषयी मी त्याच्याशी प्रामाणिकपणे गप्पा मारल्या आहेत. त्याला व्यक्त होण्याचे स्वातंत्र्यही आम्ही दिले आहे.”

रोहित शर्मा युवा खेळाडूंकडून प्रभावित –

कर्णधार रोहित शर्मा पुढे म्हणाला की, “जे लोक येत आहेत, ते चांगले काम करत आहेत याचा मला आनंद आहे. त्यांची भूमिका स्पष्ट करणे आणि त्यांच्याकडून आम्हाला काय अपेक्षा आहेत हे त्यांना कळवणे हे आमचे काम आहे. कसोटी सामन्यापूर्वी त्यांना कशी तयारी करायची आहे, हे त्यांच्यावर अवलंबून आहे. या सर्व गोष्टी आता पूर्णपणे त्या व्यक्तींवर अवलंबून आहेत. हे लोक खूप प्रतिभावान आहेत आणि भारतीय क्रिकेटला नवीन उंचीवर नेतील.”

हेही वाचा – ‘प्रेमात पडणे सोपे आहे, पण ते…’, पश्चिम बंगालच्या क्रीडामंत्र्यांनी लग्नाच्या १० व्या वाढदिवसानिमित्त शेअर केला खास VIDEO

इशानचे डॉमिनिकामध्ये कसोटी पदार्पण –

इशान किशनने डोमिनिका येथे वेस्ट इंडिजविरुद्धच्या पहिल्या कसोटीत पदार्पण केले होते. त्या सामन्यात त्याला फलंदाजीची संधी नक्कीच मिळाली होती, पण रोहित शर्माने डाव घोषित केल्यावर त्याला २० चेंडूत फक्त १ धाव करता आली. भारत दुसरा डावही खेळू शकला नाही. अशा स्थितीत इशानला पुढील सामन्यात स्वत:ला सिद्ध करण्याची मोठी संधी असेल.