India Help Pakistan To Reach World Cup Semis: बांगलादेशवर सात गडी राखून विजय मिळवून पाकिस्तानने विश्वचषकातील आपली पराभवाची स्ट्राईक मोडली आहे. या पराभवासह बांगलादेश स्पर्धेबाहेर फेकला गेला आहे. मात्र पाकिस्तान अजूनही उपांत्य फेरीच्या स्पर्धेत आहेत. पाकिस्तान आता अफगाणिस्तानला मागे टाकून पाचव्या स्थानावर पोहोचला आहे. विश्वचषकातील या तिसऱ्या विजयासह पाकिस्तानच्या खात्यात सहा पॉईंट्स आहेत तर अफगाणिस्तानकडे सुद्धा सहा पॉईंट आहेत मात्र नेट रन रेटमुळे पाकिस्तान पुढे आहे. यापुढे अफगाणिस्तानच्या हातात एक खेळ आहे तर पाकिस्तान आता न्यूझीलंड आणि इंग्लंडविरुद्ध खेळणार आहे. या दोन्ही सामन्यांमध्ये बाबर आझमच्या संघाला विजयी होणे अत्यावश्यक आहे.

पाकिस्तानचे आता आणखी फक्त दोन सामने शिल्लक असताना दोन्ही सामने जिंकूनही पाकिस्तान १० च गुण मिळवू शकतं. मात्र १० च्या पुढे जाण्याची संधी असणारे अन्य दोन संघ आता स्पर्धेत आहेत. त्यामुळे पाकिस्तानला उपांत्य फेरी गाठण्यासाठी इतरांच्या खेळीवर सुद्धा अवलंबून राहावे लागणार आहे. विशेष म्हणजे पाकिस्तानला पुढे जाण्यासाठी भारताचा विजय अत्यंत महत्त्वाचा आहे. नेमकं हे गणित काय चला पाहूया..

गुरुवार, २ नोव्हेंबरला भारत विरुद्ध श्रीलंका असा सामना होणार आहे. भारताने या सामन्यात श्रीलंकेचा पराभव केल्यास पाकिस्तानच्या अडचणी थोड्या कमी करू शकतात. दुसरीकडे अफगाणिस्तानने नेदरलँड, ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या त्यांच्या उर्वरित तीन सामन्यांपैकी फक्त एक सामना जिंकायला हवा, कारण त्यामुळे अफगाणिस्तानचे पॉईंट्स आठच राहतील. जर अफगाणिस्तानने दोन सामने जिंकले आणि त्यांच्याकडे १० गुण असतील तर पाकिस्तान नेट- रन-रेटवर पुढे येऊ शकते पण अफगाणिस्तानने तिन्ही सामने जिंकले, तर पाकिस्तानला दोन विजयही पुरेसे नसतील.

केवळ भारत व अफगाणिस्तानच्या खेळावर पाकिस्तानला मदत होऊ शकते का?

नाही, गुणतालिकेत 2, 3 आणि 4 क्रमांकावर असलेल्या संघांची कामगिरी सुद्धा पाकिस्तानसाठी महत्त्वाची असणार आहे. दक्षिण आफ्रिकेला (१० पॉईंट्स) उपांत्य फेरीत जाण्यासाठी आणखी एका विजयाची गरज आहे, तर न्यूझीलंड (८ पॉईंट्स) आणि ऑस्ट्रेलिया (८ पॉईंट्स) यांना आणखी दोन विजयांची गरज आहे. या संघांमध्ये, पाकिस्तान न्यूझीलंडशी खेळणार आहे, जिथे पाकिस्तानला काहीही करून विजयी व्हावे लागेल.

दक्षिण आफ्रिका आणि न्यूझीलंड एकमेकांशी खेळत असताना, पाकिस्तानसाठी दक्षिण आफ्रिका जिंकणे आवश्यक आहे. तसेच किवी पुन्हा श्रीलंकेकडून हरतील अशीही पाकिस्तानची प्रार्थना असणार आहे. जर न्यूझीलंडने दक्षिण आफ्रिका किंवा श्रीलंकेविरुद्ध दोनपैकी एक सामना जिंकला तर ते १० गुणांसह पुढे येतील आणि मग हा खेळ नेट रन रेटवर ठरेल.

हे ही वाचा<< IND vs ENG: रोहित शर्माची विकेट घेताना लिव्हिंगस्टोनचा गुडघा झाला लॉक अन्.. थरार पाहून प्रेक्षकांना भरली धडकी

अर्थात, जर दक्षिण आफ्रिकेने त्यांचे उर्वरित सामने जिंकले नाहीत, तर त्यांचे १० गुण होतील, पाकिस्तानला त्यांच्याशी बरोबरी करता येईल. तर इंग्लंड, अफगाणिस्तान आणि बांगलादेशविरुद्धचे सामने जिंकून ऑस्ट्रेलिया सुद्धा समसमान पातळीवर येऊ शकते. पाकिस्तानसाठी ऑस्ट्रेलियाने अफगाणिस्तानला हरवण्याची आणि मग स्वतः इंग्लंड आणि बांगलादेशकडून हरण्याची गरज आहे. ज्यामुळे त्यांचे गुण १० च होतील आणि पुन्हा नेट रन रेट निर्णायक ठरेल.

Story img Loader