Kapil Dev on Team India: आयसीसीने ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये भारतात होणार्‍या वन डे वर्ल्ड कप २०२३चे वेळापत्रक जाहीर केले आहे. यजमान भारत ८ ऑक्टोबरला ऑस्ट्रेलियाविरुद्ध आपल्या मोहिमेला सुरुवात करेल. १५ ऑक्टोबरला भारताचा कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानशी सामना होणार आहे. टीम इंडियाचा १० वर्षांचा ICC ट्रॉफीचा दुष्काळ संपवण्याचा प्रयत्न असेल. मात्र, अनेक स्टार क्रिकेटपटूंच्या दुखापतींमुळे भारतीय छावणीत सध्या थोडी चिंता आहे. वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह आणि श्रेयस अय्यर हे अनेक महिन्यांपासून भारतीय संघातून बाहेर आहेत. विकेटकीपर ऋषभ पंत एका भीषण कार अपघातामुळे बाहेर आहे. आयपीएल २०२३मध्ये के.एल. राहुलला दुखापत झाली होती.

भारतीय संघाचा माजी कर्णधार कपिल देव यांनी स्टार अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्याच्या फिटनेसवर चिंता व्यक्त केली आहे. दुखापतींमुळे यापूर्वीही खेळाडूंचे करिअर उद्ध्वस्त झाले आहेत, याकडे देव यांनी लक्ष वेधले. १९८३च्या विश्वचषक विजेत्या कर्णधाराला टीम इंडियाच्या जखमी खेळाडूंबद्दल विचारण्यात आले. या प्रश्नाला उत्तर देताना कपिल देव म्हणाले की, “दुखापतीमुळे जर भारतीय संघातील प्रमुख खेळाडूंना वगळले नाही तर संघ विश्वचषक २०२३ आधी मजबूत होईल.”

KL Rahul returns to nets after injury scare ahead BGT
KL Rahul : टीम इंडियासाठी आनंदाची बातमी! पर्थ कसोटी सामन्यापूर्वी ‘हा’ स्टार खेळाडू दुखापतीतून सावरला
Daily Horoscope 18 November 2024 in Marathi
१८ नोव्हेंबर पंचांग: संकष्टी चतुर्थी १२ पैकी कोणत्या…
Sachin Tendulkar Cryptic post about Steve Bucknor
Sachin Tendulkar : सचिन तेंडुलकरच्या ‘त्या’ पोस्टने चाहत्यांच्या वाईट आठवणी झाल्या ताज्या, ‘हा’ अनुभवी अंपायर पुन्हा आला चर्चेत
Shubman Gill injury update ahead Border Gavaskar Trophy
Shubman Gill : ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पर्थ कसोटीतून शुबमन गिल बाहेर? पहिल्या सामन्यापूर्वीच भारताची वाढली डोकेदुखी
KL Rahul Injured in Intra Squad Match Simulation Session Perth Walks Off Field for Scanning Ahead Border Gavaskar Trophy IND vs AUS
IND vs AUS: भारताला पर्थ कसोटीपूर्वी मोठा धक्का, केएल राहुलला सराव सामन्यात दुखापत, सोडावं लागलं मैदान!
Robin Uthappa Statement on CSK Angry on Franchise For Allowed New Zealand Rachin Ravindra to Train at Their Academy
Robin Uthappa: “देशहित आधी आणि नंतर फ्रँचायझीचे खेळाडू…”, रॉबिन उथप्पा CSK वर भडकला, रचिन रवींद्रला कसोटीपूर्वी मदत केल्याबद्दल सुनावलं
Virat Kohli comes now it seems like he can be dismissed without any issues says Aakash Chopra
Virat Kohli : ‘आता असं वाटतं की विराटला कोणत्याही अडचणीशिवाय…’, भारताच्या रनमशीनबद्दल आकाश चोप्राचे मोठे वक्तव्य
Mohammad Kaif says Every club has bowlers like Ajaz Patel
Mohammad Kaif : ‘एजाज पटेलसारखे गोलंदाज प्रत्येक क्लबमध्ये सापडतील…’, मुंबईतील पराभवानंतर मोहम्मद कैफ टीम इंडियावर संतापला

हेही वाचा: Asian Kabaddi Championship: भारतीय कबड्डी संघाने जिंकले सुवर्णपदक! इराणला धोबीपछाड देत बनला आशीयाई चॅम्पियन

एबीपी न्यूजशी बोलताना कपिल देव म्हणाले, “दुखापती हा प्रत्येक खेळाडूच्या आयुष्याचा भाग असतो. मला आशा आहे की परिस्थिती सुधारेल. मला नेहमीच हार्दिक पांड्याबद्दल काळजी वाटते. तो खूप लवकर जखमी होतो. जर सर्व खेळाडू तंदुरुस्त असतील तर भारतासारखा मजबूत संघ दुसरा कोणताच नाही. लक्षात घ्या की ऋषभ पंत, के.एल. राहुल, श्रेयस अय्यर आणि जसप्रीत बुमराह दुखापतींमुळे निवडीसाठी उपलब्ध नाहीत. भारतीय संघाला २०२३ विश्वचषकापूर्वी आपल्या प्रमुख खेळाडूंनी पूर्ण तंदुरुस्त होऊन संघात परतावे असे वाटते.”

कपिलने भारतीय खेळाडूंचे कसोटी आणि टी२० आंतरराष्ट्रीय सामने काही काळ थांबवण्याची सूचना केली. “एकदिवसीय विश्वचषकाची तयारी सुरू करावी”, असे ते म्हणाले. कपिल पुढे म्हणाले, “हे बघा, हा विश्वचषक चार वर्षांनंतर येतो, त्यामुळे तुम्ही पूर्ण तयारीनिशी असायला हवे. आम्हाला मॅच सरावाची गरज आहे. आणखी काही एकदिवसीय सामने खेळायचे आहेत.”

हेही वाचा: Inzamam-ul-Haq: “तुम्हाला सेहवागविरुद्ध ९ फिल्डर नाही तर १९…”, पाकिस्तानचा माजी खेळाडू इंझमाम उल हकचे मोठे विधान

सध्या, हार्दिक पांड्या आयपीएलमध्ये गुजरात टायटन्सचे नेतृत्व करत आहे. आयपीएल संपल्यानंतर तो ब्रेकवर आहे. गुजरात टायटन्सने आयपीएल २०२३च्या अंतिम फेरीत प्रवेश केला पण चेन्नई सुपर किंग्जकडून ५ विकेटने पराभव पत्करावा लागला. हार्दिक पांड्या आता वेस्ट इंडिज दौऱ्यावर क्रिकेट अ‍ॅक्शनमध्ये दिसणार आहे. भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळवली जाणार आहे, ज्यामध्ये हार्दिक पांड्या उपकर्णधाराच्या भूमिकेत दिसेल. यानंतर, हार्दिक पांड्या वेस्ट इंडिजविरुद्धच्या पाच टी२० आंतरराष्ट्रीय मालिकेत भारतीय संघाचे नेतृत्व करताना दिसणार आहे. मात्र, BCCIने वेस्ट इंडिज दौऱ्यावर होणाऱ्या टी२० आंतरराष्ट्रीय मालिकेसाठी भारतीय संघाची अद्याप घोषणा केलेली नाही.