Kapil Dev on Team India: आयसीसीने ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये भारतात होणार्या वन डे वर्ल्ड कप २०२३चे वेळापत्रक जाहीर केले आहे. यजमान भारत ८ ऑक्टोबरला ऑस्ट्रेलियाविरुद्ध आपल्या मोहिमेला सुरुवात करेल. १५ ऑक्टोबरला भारताचा कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानशी सामना होणार आहे. टीम इंडियाचा १० वर्षांचा ICC ट्रॉफीचा दुष्काळ संपवण्याचा प्रयत्न असेल. मात्र, अनेक स्टार क्रिकेटपटूंच्या दुखापतींमुळे भारतीय छावणीत सध्या थोडी चिंता आहे. वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह आणि श्रेयस अय्यर हे अनेक महिन्यांपासून भारतीय संघातून बाहेर आहेत. विकेटकीपर ऋषभ पंत एका भीषण कार अपघातामुळे बाहेर आहे. आयपीएल २०२३मध्ये के.एल. राहुलला दुखापत झाली होती.
भारतीय संघाचा माजी कर्णधार कपिल देव यांनी स्टार अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्याच्या फिटनेसवर चिंता व्यक्त केली आहे. दुखापतींमुळे यापूर्वीही खेळाडूंचे करिअर उद्ध्वस्त झाले आहेत, याकडे देव यांनी लक्ष वेधले. १९८३च्या विश्वचषक विजेत्या कर्णधाराला टीम इंडियाच्या जखमी खेळाडूंबद्दल विचारण्यात आले. या प्रश्नाला उत्तर देताना कपिल देव म्हणाले की, “दुखापतीमुळे जर भारतीय संघातील प्रमुख खेळाडूंना वगळले नाही तर संघ विश्वचषक २०२३ आधी मजबूत होईल.”
एबीपी न्यूजशी बोलताना कपिल देव म्हणाले, “दुखापती हा प्रत्येक खेळाडूच्या आयुष्याचा भाग असतो. मला आशा आहे की परिस्थिती सुधारेल. मला नेहमीच हार्दिक पांड्याबद्दल काळजी वाटते. तो खूप लवकर जखमी होतो. जर सर्व खेळाडू तंदुरुस्त असतील तर भारतासारखा मजबूत संघ दुसरा कोणताच नाही. लक्षात घ्या की ऋषभ पंत, के.एल. राहुल, श्रेयस अय्यर आणि जसप्रीत बुमराह दुखापतींमुळे निवडीसाठी उपलब्ध नाहीत. भारतीय संघाला २०२३ विश्वचषकापूर्वी आपल्या प्रमुख खेळाडूंनी पूर्ण तंदुरुस्त होऊन संघात परतावे असे वाटते.”
कपिलने भारतीय खेळाडूंचे कसोटी आणि टी२० आंतरराष्ट्रीय सामने काही काळ थांबवण्याची सूचना केली. “एकदिवसीय विश्वचषकाची तयारी सुरू करावी”, असे ते म्हणाले. कपिल पुढे म्हणाले, “हे बघा, हा विश्वचषक चार वर्षांनंतर येतो, त्यामुळे तुम्ही पूर्ण तयारीनिशी असायला हवे. आम्हाला मॅच सरावाची गरज आहे. आणखी काही एकदिवसीय सामने खेळायचे आहेत.”
सध्या, हार्दिक पांड्या आयपीएलमध्ये गुजरात टायटन्सचे नेतृत्व करत आहे. आयपीएल संपल्यानंतर तो ब्रेकवर आहे. गुजरात टायटन्सने आयपीएल २०२३च्या अंतिम फेरीत प्रवेश केला पण चेन्नई सुपर किंग्जकडून ५ विकेटने पराभव पत्करावा लागला. हार्दिक पांड्या आता वेस्ट इंडिज दौऱ्यावर क्रिकेट अॅक्शनमध्ये दिसणार आहे. भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळवली जाणार आहे, ज्यामध्ये हार्दिक पांड्या उपकर्णधाराच्या भूमिकेत दिसेल. यानंतर, हार्दिक पांड्या वेस्ट इंडिजविरुद्धच्या पाच टी२० आंतरराष्ट्रीय मालिकेत भारतीय संघाचे नेतृत्व करताना दिसणार आहे. मात्र, BCCIने वेस्ट इंडिज दौऱ्यावर होणाऱ्या टी२० आंतरराष्ट्रीय मालिकेसाठी भारतीय संघाची अद्याप घोषणा केलेली नाही.