Jay Shah on Jasprit Bumrah: भारतात ५ ऑक्टोबरपासून सुरू होणाऱ्या एकदिवसीय विश्वचषकाच्या वेळापत्रकात फेरबदल होण्याची दाट शक्यता आहे. बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी सांगितले की, आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या तीन पूर्ण सदस्य देशांनी त्यांच्या सामन्यांचे वेळापत्रक बदलण्यासाठी पत्र लिहिले आहे. शाह यांच्या म्हणण्यानुसार येत्या तीन ते चार दिवसांत विश्वचषकाच्या वेळापत्रकावर निर्णय घेतला जाईल. तसेच, सचिव जय शाह यांनी गुरुवारी पुष्टी केली की, भारतीय वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह आता भारत आणि आयर्लंड यांच्यातील टी२० मालिकेत खेळण्यासाठी तंदुरुस्त आहे. तो पूर्णपणे फिट असून विश्वचषकाआधी संघात पुनरागमन करणार आहे.”

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

जय शाह यांनी जसप्रीत बुमराह बाबत केला मोठा खुलासा

जय शाह पत्रकार परिषदेत म्हणाले, “विश्वचषक स्पर्धेच्या मूळ वेळापत्रकात काही बदल होण्याची अपेक्षा आहे, जे तीन-चार दिवसांत जाहीर केली जाईल. बदल कार्यक्रमात असतील, सामन्यांच्या ठिकाणात नाहीत. आयसीसी आणि बीसीसीआयचे अधिकारी यावर विचार करत आहेत. पूर्ण तंदुरुस्त झाल्यानंतर बुमराह ऑगस्टमध्ये आयर्लंडविरुद्ध टी२० मालिकेत खेळू शकतो”, असेही शाहांनी सांगितले.

हेही वाचा: IND vs WI 1st ODI: पापणी लवते ना लवते तोच…, विराट कोहलीने एका हाताने घेतला अफलातून कॅच; पाहा Video

बुमराह बऱ्याच दिवसांपासून संघाबाहेर आहे. सप्टेंबर २०२२मध्ये तो ऑस्ट्रेलियाविरुद्ध शेवटचा सामना खेळला होता. या वर्षी मार्च महिन्यात न्यूझीलंडमध्ये पाठीवर शस्त्रक्रिया झाल्यापासून त्याचा बंगळुरू येथील राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत संघात पुनरागमन करण्यासाठी सराव सुरू आहे.

हेही वाचा: IND vs WI 1st ODI: लाइव्ह सामन्यादरम्यान शार्दुल ठाकूर भिडला अंपायरशी, मैदान सोडण्यास दिला नकार; पाहा Video

बीसीसीआयने गेल्या आठवड्यात मेडिकल अपडेटमध्ये म्हटले होते की, “बुमराह नेटमध्ये पूर्ण क्षमतेने गोलंदाजी करत आहे.” शाह पुढे म्हणाले, “बुमराह पूर्णपणे तंदुरुस्त आहे आणि तो आयर्लंडलाच्या दौऱ्यावर जाणार आहे. आशिया चषक आणि विश्वचषक स्पर्धेसाठी खेळाडूंच्या निवडीत सातत्य राहील.” एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेदरम्यान चाहत्यांसाठी असलेल्या सुविधांबद्दल बोलताना जय शहा यांनी सांगितले की, “ते सामन्यांदरम्यान प्रेक्षकांना मोफत पिण्याचे पाणी उपलब्ध करून देण्यावर काम करत आहेत, एका एजन्सीद्वारे हाऊसकीपिंग, टॉयलेटच्या सुविधा सुधारण्यास प्राधान्य दिले जात आहेत. त्याचबरोबर स्टेडियममधील स्वच्छतेवर देखील विशेष काम करण्यात येत आहे.”

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Team india jasprit bumrah will go on ireland tour bcci secretary jay shah gave information avw