Rahul Dravid Big Statement Before WTC Final 2023 : भारताने मागील दहा वर्षात आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेची कोणतीही ट्रॉफी जिंकली नाही, पण मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविडने सोमवारी माध्यमांशी बोलताना अनेक मुद्द्यांवर भाष्य केलं. ऑस्ट्रेलियाविरुद्ध होणाऱ्या विश्व टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलआधी टीम इंडियावर कोणत्याही प्रकारचा दबाव नाही. ट्रॉफी जिंकणं खूप महत्वाचं असेल, कारण मागील दोन वर्षांपासून टीम प्रचंड मेहनत करत आहे. न्यूझीलंडने २०२१ च्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये भारताचा पराभव केला होता. तर आयसीसीच्या अन्य टूर्नामेंटमध्ये भारताचा नॉकआऊटमध्ये पराभव झाला आहे, अशी प्रतिक्रिया द्रविडने दिली आहे.
द्रविड माध्यमांशी बोलताना पुढे म्हणाला, “आमच्यावर कोणत्याच प्रकारचा दबाव नाही. आयसीसी ट्रॉफी जिंकण्याचा प्रयत्न करत असून आम्ही कोणत्याही प्रकारच्या दबावाला बळी पडत नाहीय. ट्रॉफी जिंकणं निश्चितच खूप चांगली गोष्ट असेल. आयसीसी टूर्नामेंट जिंकण्यात यशस्वी होणं, निश्चितच महत्वाचं असेल. परंतु, हे यश पदरी पडल्यावर असाही विचार करावा लागेल की, दोन वर्षांच्या कठोर मेहनतीचं हे यश आहे. अनेक गोष्टींमध्ये यश मिळवल्यावरच तुम्ही इथपर्यंत पोहोचता. त्यामुळे आमच्याकडे अनेक सकारात्मक पैलू आहेत. ऑस्ट्रेलियाकडून मालिका जिंकणं, इथे मालिका ड्रॉ करणं, प्रत्येक ठिकाणी मोठी प्रतिस्पर्धा करणं या टीमला योग्यप्रकारे जमतं. या गोष्टी फक्त इतिहास बदलणार नाहीत की, तुम्ही आयसीसी ट्रॉफी जिंकली नाहीय.”
नक्की वाचा – “आमची पदकं ज्यांना १५ रुपयांची वाटतात असे लोक आता…”, साक्षी मलिकने ठणकावलं!
द्रविडने अनुभवी फलंदाज अजिंक्य रहाणेबद्दल बोलताना म्हटलं की, “हे खूप चांगली आहे की, तो टीमसोबत आहे. काही खेळाडूंना दुखापत झाल्याने त्याला टीममध्ये पुनरागमन करण्याची संधी मिळाली. आमच्याकडे त्याच्यासारखा प्रतिभावंत खेळाडू आहे, ही खूप चांगली गोष्ट आहे. त्याच्या टीममध्ये समावेश झाल्याने आमच्याकडे अनुभवी खेळाडू सामील झाल्यासारखं आहे. त्याने विदेशात चांगली कामगिरी केली आहे. तसंच इंग्लंडमध्येही त्याने जबरदस्त इनिंग खेळल्या आहेत. त्याच्या नेतृत्वात टीमला काही वेळेला यश प्राप्त करता आलं आहे.”