इंग्लंडविरूद्धच्या कसोटी मालिकेत १-०ने पिछाडीवर असलेल्या भारतीय संघाने पुढील दोन सामन्यात दमदार पुनरागमन केलं. दुसरा आणि तिसरा कसोटी सामना जिंकून भारताने मालिकेत २-१ची आघाडी घेतली आहे. त्यामुळे मालिका बरोबरीत सोडवण्यासाठी चौथ्या आणि शेवटच्या कसोटीत इंग्लंडच्या संघाला विजय मिळवणं अनिवार्य आहे. तर विश्व अजिंक्यपद स्पर्धेची अंतिम फेरी गाठण्यासाठी भारताला हा सामना जिंकणे किंवा अनिर्णित राखणे महत्त्वाचे आहे. अशातच भारताच्या आघाडीच्या वेगवान गोलंदाजाने चौथ्या कसोटीतून माघार घेतली असल्याची माहिती बीसीसीआयने दिली आहे.

Ind vs Eng: चौथ्या कसोटीआधी इंग्लंडला धक्का; स्टार खेळाडूची माघार

भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह याने चौथ्या आणि शेवटच्या कसोटीतून माघार घेतली आहे. काही वैयक्तिक कारणांसाठी चमूतून आणि बायो-बबलमधून बाहेर जाण्याची परवानगी द्यावी अशी विनंती बुमराहने बीसीसीआय व्यवस्थापनाला केली होती. त्यानुसार त्याला संघातून रिलीज करण्यात आले आहे, अशी माहिती ट्विटरच्या माध्यमातून देण्यात आली आहे. बुमराहच्या जागी कोणत्याही बदली खेळाडूला चमूत समाविष्ट करून घेण्यात आलेले नाही. त्यामुळे शेवटच्या सामन्यासाठी इशांत शर्मा, मोहम्मद सिराज आणि उमेश यादव यांच्यापैकी दोघांना संधी मिळण्याची शक्यता आहे.

Ind vs Eng: खेळपट्टीचा वाद ऐन रंगात असताना गावसकरांचं महत्त्वाचं वक्तव्य, म्हणाले…

चौथ्या कसोटी सामन्यासाठी भारतीय संघ- विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा, मयंक अग्रवाल, शुभमन गिल, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे (उपकर्णधार), के एल राहुल, हार्दिक पांड्या, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), वृद्धिमान साहा (यष्टीरक्षक), रविचंद्रन अश्विन, कुलदीप यादव, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, इशांत शर्मा, मोहम्मद सिराज, उमेश यादव.