Team India Celebrate Diwali with family: विजयरथावर स्वार झालेल्या टीम इंडियाचा शेवटचा साखळी सामना आज नेदरलँडशी होत आहे. साखळी फेरीतील हा शेवटचा म्हणजेच ४५वा सामना आहे. या शेवटच्या साखळी सामन्यापूर्वी भारतीय संघाने दिवाळी उत्साहात साजरी केली. दिवाळीच्या संध्याकाळी संपूर्ण टीम आपल्या कुटुंबसोबत एकत्र दिसली. ही पार्टी बंगळुरूमध्येच आयोजित करण्यात आली होती, कारण टीम इंडिया नेदरलँड्सविरुद्धच्या सामन्यासाठी बेंगळुरूमध्ये उपस्थित आहे. या पार्टीचा व्हिडीओ बीसीसीआयने शेअर केला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

या पार्टीला भारतीय खेळाडू आणि कर्मचारी त्यांच्या पत्नी आणि मुलांसह पोहोचले होते. सर्वांनी पारंपरिक कपडे घातले होते. पुरुषांनी कुर्ता-पायजमा परिधान केला होता, तर स्त्रियांनी साडी किंवा सलवार-सूट परिधान केला होता. विराट कोहलीसह अनुष्का शर्माही दिसली. या दरम्यान अनुष्काचा बेबी बंपही दिसत होता. अशा परिस्थितीत विराट तिला चालायला मदत करतानाही दिसला.

टीम इंडियाची दिवाळी पार्टी –

दिवाळीच्या संध्याकाळी टीम इंडियाच्या पार्टीत सर्व खेळाडू पारंपरिक कपड्यांमध्ये दिसले. या पार्टीत विवाहित खेळाडू त्यांच्या पत्नीसह पोहोचले होते. विराट कोहली आणि अनुष्का, रोहित शर्मा आणि रितिका सजदेह यांनी पार्टीला हजेरी लावली. या पार्टीत टीमचे युवा खेळाडू इशान किशन आणि शुबमन गिल खूप मस्ती करताना दिसले. शार्दुल ठाकूर आणि शुबमन गिल यांनी एकसारखे कुर्ते घातले होते. काळ्या कुर्त्यात इशान किशनही डॅशिंग दिसत होता.

या पार्टीत विराट कोहलीचा लूकही पाहण्यासारखा होता. कोहली हिरव्या रंगाचा कुर्ता तर अनुष्काने गुलाबी रंगाचा कुर्ता घातला होता. रोहित शर्माने स्काय ब्लू कुर्ता घातला होता तर त्याची पत्नी रितिकाही गुलाबी रंगाच्या साडीत दिसली. पांढऱ्या रंगाचा कुर्ता परिधान केलेल्या या पार्टीत सूर्यकुमार यादव डॅशिंग दिसत होता. या पार्टीत मोहम्मद शमी आणि मोहम्मद सिराजचा लूकही पाहण्यासारखा होता.

हेही वाचा – IND vs NED: एम चिन्नास्वामी स्टेडियमवर रंगणार भारत आणि नेदरलँड्स सामना, जाणून घ्या खेळपट्टी आणि हवामान अहवाल

यंदाच्या विश्वचषक स्पर्धेत टीम इंडिया आठपैकी आठ सामने जिंकून सध्या १६ गुणांसह गुणतालिकेत अव्वल स्थानावर आहे. पहिल्या स्थानावर राहून संघ उपांत्य फेरीसाठी पात्र ठरला आहे. त्याच वेळी दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलियाने प्रत्येकी १४ गुणांसह दुसरे आणि तिसरे स्थान मिळवले. न्यूझीलंड संघ १० गुणांसह चौथ्या स्थानावर आहे.

१५ आणि १६ नोव्हेंबरला दोन उपांत्य फेरीचे सामने होणार आहेत. पहिल्या उपांत्य फेरीत भारतासमोर न्यूझीलंडचे आव्हान असेल. हा सामना वानखेडे, मुंबई येथे होणार आहे.त्याचवेळी दुसऱ्या उपांत्य फेरीत दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलियाचे संघ आमनेसामने येतील. हा सामना कोलकात्याच्या ईडन गार्डन्सवर खेळवला जाईल. टीम इंडिया नेदरलँड्सविरुद्धचा सामन्याकडे उपांत्य फेरीची तयारी म्हणून पाहत असणार आहे, जेणेकरून उपांत्य फेरीपूर्वी सर्व खेळाडू तंदुरुस्त राहतील.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Team india players celebrated diwali with their families before their match against netherlands vbm
Show comments