Rohit Sharma Sets New Test Record : भारताचा कर्णधार रोहित शर्माने एक खास विकम केला आहे. रोहितने भारताचा डाव सुरु होताच २१ धावा केल्या आणि त्याच्या १७००० धावा पूर्ण झाल्या. भारतासाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये १७ हजार धावा बनवण्यात रोहित शर्मा सातवा फलंदाज ठरला आहे. रोहितच्या आधी सचिन तेंडुलकर, विराट कोहली, राहुल द्रविड,सौरव गांगुली, एम एस धोनी आणि विरेंद्र सेहवागने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये अशाप्रकारची चमकदार कामगिरी केली आहे.
सचिन तेंडुलकरने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये भारतासाठी सर्वात जास्त धावा केल्या आहे. तेंडुलकर जागतिक क्रिकेटमध्ये सर्वात जास्त धावा करणारा फलंदाज आहे. महान फलंदाज सचिनने त्याच्या आंतरराष्ट्रीय करिअरमध्ये ३४,३५७ धावा करण्याचा विक्रम केला आहे. तसंच श्रीलंकेचा दिग्गज फलंदाज कुमार संगकाराने त्याच्या करिअरमध्ये २८,०१६ धावा कुटल्या आहेत.
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये १७००० धावा करणारे सक्रीय खेळाडू
१) विराट कोहली – २५०४७
२) जो रूट – १८०४८
३) डेविड वॉर्नर – १७०५९
४) रोहित शर्मा – १७०११*
टीम इंडियाचा कर्णधार ३५ धावा करून बाद झाला. रोहितला फिरकीपटू मॅथ्यूने झेलबाद केलं. रोहित फलंदाजीच्या चांगल्या लयमध्ये दिसत होता, पण मॅथ्यूने टाकलेल्या चेंडूने रोहितला चकवा दिला आणि शॉर्ट पॉईंटला लाबुशेने त्याची झेल घेतली. रोहितने त्याच्या इनिंगमध्ये ५८ चेंडू खेळले. त्याने ३५ धावांच्या खेळीत ३ चौकार आणि १ षटकार मारला. गिलसोबत रोहितने पहिल्या विकेटसाठी ७४ धावांची भागिदारी केली. ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात ४८० धावा केल्या. ज्यामध्ये ख्वाजाने १८० धावांची जबरदस्त खेळी केली. भारताचा अनुभवी फिरकीपटू आश्विनने ६ विकेट्स घेत कांगांरुंचा डाव संपवला.