India vs South Africa Test Series: सेंच्युरियनमध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध बॉक्सिंग डे कसोटीसाठी भारतीय संघ सज्ज झाला आहे. २६ डिसेंबरपासून उभय संघांमधील दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेला सुरुवात होणार आहे. भारताने १९९२ मध्ये दक्षिण आफ्रिकेच्या भूमीवर पहिला कसोटी सामना खेळला होता. या कालावधीत, दोन्ही संघांमध्ये ४ कसोटी सामन्यांची मालिका खेळली गेली, त्यापैकी ३ सामने अनिर्णित राहिले आणि आफ्रिकेने १ सामना जिंकून मालिका जिंकली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

टीम इंडियाने दक्षिण आफ्रिकेचे आठ दौरे केले

आतापर्यंत भारतीय संघाने दक्षिण आफ्रिकेचे आठ दौरे केले, ज्यामध्ये टीम इंडियाला एकही कसोटी मालिका जिंकता आली नाही. अशा स्थितीत यावेळी रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली कसोटी मालिका जिंकून भारतीय संघ नवा सुवर्ण इतिहास लिहिण्याचा प्रयत्न करेल.टीम इंडियाने २००६ मध्ये दक्षिण आफ्रिकेच्या भूमीवर पहिला कसोटी विजय मिळवला होता, मात्र त्या काळातही भारताला दक्षिण आफ्रिकेकडून तीन कसोटी सामन्यांची मालिका २-१ने गमावावी लागली होती. त्यानंतर, २०१० मध्ये, भारतीय संघ आफ्रिकेतील दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेत १-१ अशी बरोबरी करण्यात यशस्वी ठरला होता. मात्र टीम इंडियाचे दक्षिण आफ्रिकेत कसोटी मालिका जिंकण्याचे स्वप्न अद्याप पूर्ण झालेले नाही.

रोहित, विराट आणि बुमराह यांच्यावर नजर आहे

सर्वांच्या नजरा टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा आणि स्टार खेळाडू विराट कोहली यांच्यावर असतील. दोन्ही खेळाडूंचे लक्ष कसोटी क्रिकेटवर आहे, कारण विश्वचषकापासून, दोन्ही खेळाडूंनी ऑस्ट्रेलिया आणि मूळ दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मर्यादित षटकांच्या मालिकेत भाग घेतला नाही. अशा परिस्थितीत भारतीय संघाला दक्षिण आफ्रिकेत पहिली कसोटी मालिका जिंकून देण्यात त्यांची महत्त्वाची भूमिका असेल आणि ती बजावतील अशी आशा टीम इंडियाच्या चाहत्यांना आहे. याशिवाय दक्षिण आफ्रिकेच्या वेगवान आणि उसळत्या खेळपट्ट्यांवर जसप्रीत बुमराहच्या नेतृत्वाखाली भारताच्या वेगवान गोलंदाजी विभागावरही बरीच जबाबदारी असेल. भारताने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध त्यांच्या भूमीवर ४ कसोटी सामने जिंकले आहेत, तर दक्षिण आफ्रिकेने भारतीय भूमीवर एक मालिका जिंकली आहे.

भारतीय क्रिकेट संघाने २६ डिसेंबर रोजी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध होणाऱ्या बॉक्सिंग-डे कसोटीपूर्वी तयारी सुरू केली आहे. दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना सेंच्युरियनमध्ये खेळवला जाणार आहे, ज्यासाठी टीम इंडियाच्या दिग्गजांनी आज सराव सत्रात घाम गाळला. भारतीय संघाचे पहिले सराव सत्र सकाळी साडेनऊ वाजता सुरू झाले. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ दक्षिण आफ्रिकेच्या भूमीवर ३० वर्षांत प्रथमच कसोटी मालिका जिंकून इतिहास रचू इच्छितो.

के.एल. राहुलने विकेटकीपिंगचा सराव केला

याशिवाय, भारताच्या सराव सत्रात, के.एल. राहुल यष्टीरक्षणाचा सराव करताना दिसला, त्याच्या हातात ग्लोव्हज होते. त्यामुळे या कसोटी मालिकेत त्याची यष्टीरक्षक म्हणून दिसण्याची शक्यता आणखी वाढली आहे. याशिवाय रोहित शर्माने मध्यवर्ती खेळपट्टीवर फलंदाजीचा सरावही केला आहे. रवींद्र जडेजा, जसप्रीत बुमराह, शार्दुल ठाकूर यांनीही गोलंदाजीचा सराव केला आहे.

हेही वाचा: IND W vs AUS W: ऑस्ट्रेलियन कर्णधार बनली फोटोग्राफर, अ‍ॅलिसा हिलीने विजेत्या भारतीय महिला संघाचे काढले फोटो; पाहा Video

भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका कसोटीसाठी भारतीय संघ

रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, यशस्वी जैस्वाल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, के.एल. राहुल (यष्टीरक्षक), रविचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, मोहम्मद सिराज, मुकेश कुमार, जसप्रीत बुमराह (उपकर्णधार), प्रसिध्द कृष्णा, केएस भरत (यष्टीरक्षक)

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Team india started practice kohli rohit batted in the nets kl did wicket keeping practice avw