Ajit Agarkar on Team India: अजित आगरकर बीसीसीआयच्या निवड समितीचे नवे अध्यक्ष बनल्यामुळे, त्यांच्यासाठी काम आता अधिक वाढले आहे. अजित आगरकर यांना आता भारतीय क्रिकेट संघासाठी ५ मोठे निर्णय तातडीने घ्यावे लागणार आहेत. काही प्रमुख निर्णयांमध्ये विराट कोहली आणि रोहित शर्मा यांच्या भवितव्यासह हार्दिक पांड्याची टी२० संघाचा कायम कर्णधार म्हणून नियुक्ती असे प्रश्न समाविष्ट आहेत.

1. टेस्ट आणि टी२० संघाची नव्याने बांधणी

अजित आगरकरांच्या अजेंडावरील सर्वात महत्त्वाच्या गोष्टींपैकी एक म्हणजे संपूर्ण कसोटी आणि टी२० संघाची नव्याने रचना करणे. टी२० आणि कसोटी संघाची पूर्णपणे नव्याने बांधणी करणे गरजेचे आहे. भारतात मोठ्या प्रमाणात युवा खेळाडू तयार होत असल्याने त्यांना संघात स्थान देण्यात येईल यात आश्चर्य वाटणार नाही. जरी एकदिवसीय संघ पूर्णपणे सेट केलेला नसला तरी, त्यात एक कोर सेटअप आहे जो आवश्यकतेनुसार बदलला जाऊ शकतो.

Maharashtra Kesari 2025 Kustigir Parishad Offical Sandip Bhondave Statement on Shivraj Rakshe and Mahendra Gaikwad
Maharashtra Kesari 2025: “रिप्लेमध्ये दिसतंय पंचांचा निर्णय चुकलाय पण…”, महाराष्ट्र केसरीमधील वादानंतर परिषदेच्या पदाधिकाऱ्यांचं मोठं वक्तव्य
economic survey nuances
Economic Survey: आर्थिक सर्वेक्षण अहवाल सांगतोय २०२५ हे…
Investment AI and Automation Artificial Intelligence and DeepTech
गुंतवणूक: अंमलबजावणीची कसोटी
pune Senior writer Madhu Mangesh Karnik said marathi bhashela urlisurleli nidi deu naka
‘मराठीला उरलासुरला निधी नको;’ ज्येष्ठ साहित्यिकाने सरकारला सुनावले खडे बोल
Senior officials unhappy over mismanagement in Maharashtra
निर्ढावलेले प्रशासन, गैरसोयीचे महाराष्ट्र सदन
Hardik Pandya knock put pressure on other India batters say Parthiv Patel after Team India defeat against England
IND vs ENG : ‘त्याच्या संथ खेळीमुळे इतर फलंदाजांवर दबाव वाढला,’ माजी खेळाडूने भारताच्या पराभवाचे खापर हार्दिकवर फोडले
ICC Announces T20 Team of The Year 2024 Indias Rohit Sharma Named Captain of Squad
ICC T20I Team of The Year: ICC ने जाहीर केला सर्वाेत्कृष्ट टी-२० संघ २०२४, रोहित शर्मा कर्णधार; भारताच्या चार खेळाडूंना मिळाली संधी
Chhagan Bhujbal On Amit Shah
Chhagan Bhujbal : अमित शाहांबरोबर आज राजकीय चर्चा झाली का? भुजबळांनी स्पष्ट सांगितलं; म्हणाले, “एवढी चर्चा…”

टी२० आणि एकदिवसीय दोन्ही संघांसाठी हीच गरज असेल. नवीन पिढीसाठी मार्ग मोकळा करण्यासाठी वरिष्ठांच्या बाबतीत निर्णय घेण्याची वेळ जवळ येत आहे. नवीन खेळाडूंना संघात संधी आणि जुने वरिष्ठ खेळाडूंना हळूहळू निरोप ही एक नैसर्गिक प्रक्रिया असणे आवश्यक आहे. मग काय करण्याची गरज आहे? कर्णधाराला हवे ते निर्णय घेण्याची मुभा द्या. कर्णधाराला आवश्यक असलेल्या संघाचा निर्णय घेऊ द्या. टी२० विश्वचषकापासून हार्दिक पांड्या भारताच्या टी२० संघाचे नेतृत्व करत आहे. कसोटी सेटअपमध्येही बदल करणे आवश्यक आहे. १४ महिने क्रिकेटविना असलेल्या अजिंक्य रहाणेला वेस्ट इंडिजविरुद्धच्या दौऱ्यासाठी उपकर्णधार म्हणून निवडण्यात आल्याने अनेक क्रिकेट पंडितांना आश्चर्य वाटले. त्यामुळे भविष्यावर लक्ष केंद्रित करून कसोटी आणि टी२० या दोन्ही संघांना पूर्णपणे नव्याने तयार करण्याची गरज आहे.

2. हार्दिक पांड्या कायमस्वरूपी टी२० आणि वन डे कर्णधार?

अजित आगरकरने दुसरा महत्त्वाचा निर्णय घ्यायचा आहे तो म्हणजे हार्दिक पांड्याची टी२० आणि एकदिवसीय संघाचा कायमस्वरूपी कर्णधार म्हणून नियुक्ती. भारतीय अष्टपैलू खेळाडू गेल्या काही काळापासून टी२० संघाचे नेतृत्व करत आहे आणि त्याने एक सक्षम कर्णधार म्हणून आपण तयार आहोत हे वेळोवेळी दाखवले आहे. त्याच्या नेतृत्वाखाली, गुजरात टायटन्सने त्यांच्या सुरुवातीच्या हंगामात आयपीएल जिंकले आणि २०२३मध्ये अंतिम फेरी गाठली.

जर रोहित शर्माचा पर्याय म्हणून निवडण्याची वेळ आली तर बीसीसीआय एक तरुण टी२० संघ शोधत असताना, पांड्या नेतृत्व करणारा सर्वोत्तम खेळाडू वाटतो. आगामी टी२० विश्वचषकासाठी भारताने आतापासून तयारी करणे आवश्यक आहे. त्यासाठी संघ बांधणीवर जोर देणे आवश्यक आहे. भारताने ट्रॉफी मायदेशी आणण्यावर लक्ष केंद्रित केले पाहिजे. एकदिवसीय सामन्यांबद्दल, जडेजा आणि बुमराह यांच्यासारख्या संघाचे नेतृत्व करण्यासाठी उपस्थित असलेल्या पर्यायांबाबत देखील विचार करायला हवा. पांड्याकडे कर्णधारपद सोपवण्याबद्दल संमिश्र मते असतील. रोहित शर्मा या वर्षी शेवटचा एकदिवसीय विश्वचषक खेळत असल्याने, बदली कर्णधार शोधण्याची वेळ आली आहे.

हेही वाचा: Best Test Cricketer: कोहली-अश्विन नव्हे, ‘हे’ आहे हरभजनचे ५ आवडते कसोटी क्रिकेटपटू! मात्र नाव लिहिताना असे काही केले की…

3. भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक म्हणून राहुल द्रविडचे भविष्य

भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक म्हणून राहुल द्रविडचा कार्यकाळ उत्तम म्हणून म्हणता येणार नाही. मोठ्या स्पर्धांमध्ये विशेषत: आंतरराष्ट्रीय स्तरावर भारतीय संघ ‘द वॉल’च्या प्रशिक्षक नेतृत्वात  गडगडला आहे. आशिया चषक २०२२मध्ये सुपर ४ मधून बाहेर पडणे, त्यानंतर गेल्या वर्षी टी२० विश्वचषकातील उपांत्य फेरीतून बाहेर पडणे BCCIसाठी ही चांगली गोष्ट नाही. WTC फायनलमध्ये ऑस्ट्रेलियाकडून भारताचा अपमानास्पद पराभव झाला. द्रविडचे दिवस मोजलेले नाहीत, परंतु २०२३चा विश्वचषक हा त्याच्यासाठी संघाचा प्रशिक्षक म्हणून कारकीर्द वाढवण्याचा मोठा मुद्दा असेल. जर मायदेशात होणारा वर्ल्डकप भारताने जिंकला तर अजित आगरकरला भारतासाठी दुसरा मुख्य प्रशिक्षक शोधण्यासाठी कठीण होणार आहे.

4. टी२० विश्वचषक आणि WTC फायनलमधील अपयशानंतर विश्वचषक संघावर लक्ष केंद्रित करणे

अजित आगरकरला आता वन डे संघाकडेही लक्ष वळवावे लागणार आहे. मागील आयसीसी स्पर्धांमध्ये वारंवार अपयशी ठरल्यानंतर, मेन इन ब्लू आता सर्वांच्या नजरेत आली आहे. यजमान आणि विजयाचे दावेदार म्हणून जर २०२३चा विश्वचषक जिंकू शकले नाहीत तर ही भारतासाठी खूप मोठी नामुष्की असणार आहे. विश्वचषकाला अजून वेळ शिल्लक असल्याने लवकरात लवकर संघाची योग्य निवड करणे गरजेचे आहे. मात्र, त्याआधी बीसीसीआयला सतत होणाऱ्या खेळाडूंच्या दुखापतींकडे लक्ष देणे आवश्यक आहे.

हेही वाचा: IND vs WI: टीम इंडियाच्या नेट प्रॅक्टिस दरम्यान विराट कोहली बनला प्रशिक्षक, यशस्वीला दिला खास गुरुमंत्र, पाहा video

5. वरिष्ठांच्या बाबतीत योग्य तो निर्णय घेणे

शेवटचा आणि आगरकरला सर्वात महत्त्वाचा निर्णय घ्यावा लागणार आहे तो म्हणजे संघातील वरिष्ठ खेळाडूंच्या कारकीर्दीबाबत काय करायचे? नवीन संघ तयार करताना तरुणांचा समावेश कितपत असावा यावर संयम ठेवावा लागेल. भारतीय संघ आता खेळाडूंच्या पुढील तुकडीसाठी सज्ज झाला आहे आणि वरिष्ठांना पुढील नेतृत्वाकडे मशाल देण्याची वेळ आली आहे.

विराट कोहली ३४ वर्षांचा आहे आणि त्याच्यामध्ये सर्वोच्च स्तरावर क्रिकेट खेळण्यासाठी जास्तीत जास्त २ वर्षे शिल्लक आहेत आणि हे विशेषतः त्याच्या फिटनेसवर अवलंबून आहे. दुसरीकडे, रोहित शर्मा, भुवनेश्वर कुमार, मोहम्मद शमी आणि रविचंद्रन अश्विन यांसारख्या इतर खेळाडूंना हळूहळू बाहेर पडण्याची वेळ आली आहे. BCCIने हे स्पष्ट केले आहे की २०२४च्या विश्वचषकासाठी टी२० संघ हा तरुणांचा असेल, ज्यामध्ये एकमेव वरिष्ठ कोहली असण्याची शक्यता असेल. पण रोहित शर्मा, मोहम्मद शमी आणि भुवनेश्वर कुमार यांच्यासाठी खेळाच्या सर्वात लहान फॉरमॅटमधून बाहेर पडण्याची हीच वेळ आहे. एकदिवसीय क्रिकेटमध्ये हे त्रिकूट एक-दोन वर्षे खेळ पुढे चालू ठेवू शकतात. दुसरीकडे चेतेश्वर पुजारा आणि अश्विन या खेळाडूंनीही हळूहळू लाल-बॉल क्रिकेटमधून आपले बुड हलवायला सुरुवात केली पाहिजे.

Story img Loader