इंग्लंडमध्ये सुरु असलेल्या विश्वचषक स्पर्धेतली चांगली कामगिरी भारतीय संघाला चांगलीच फळाला आलेली दिसत आहे. वन-डे क्रमवारीत पहिलं स्थान कमावलेल्या इंग्लंडला, विश्वचषक स्पर्धेतील सलग ३ पराभवांमुळे आपलं स्थान गमवावं लागलं आहे. यादरम्यान भारताने मिळालेल्या संधीचा फायदा घेत अव्वल स्थानावर झेप घेतली आहे. आतापर्यंत झालेल्या चारही सामन्यांमध्ये भारतीय संघाने विजय मिळवला आहे.

सध्याच्या घडीला १२३ गुणांसह टीम इंडिया वन-डे क्रमवारीत अव्वल स्थानावर आहे. तर सलग ३ पराभव झेलावे लागलेल्या इंग्लंडच्या खात्यात १२२ गुण जमा आहेत. Espncricinfo या संकेतस्थळाने यासंदर्भातलं वृत्त जाहीर केलं आहे, आयसीसीने मात्र आपल्या संकेतस्थळावर आणि सोशल मीडिया अकाऊंटवर याची अधिकृतपणे माहिती दिली नाहीये.

दरम्यान सलग ४ विजयांनंतर भारतीय संघाला गुरुवारी वेस्ट इंडिजविरुद्ध दोन हात करायचे आहेत. तर रविवारी भारतीय संघ यजमान इंग्लंडविरुद्ध खेळेल.