World Cup 2023 India squad: आशिया कपमध्ये टीम इंडियाचा पहिला सामना पाकिस्तानविरुद्ध २ सप्टेंबरला असणार आहे. टीम इंडिया ‘अ’ गटात पाकिस्तान आणि नेपाळविरुद्ध सामने खेळणार आहे. भारत आशिया चषक विजेतेपदाचा प्रबळ दावेदार आहे. हा आशिया चषक अनेक खेळाडूंसाठीही महत्वाचा आहे कारण, येथे जे खेळाडू चांगली कामगिरी करतील त्यांचीच विश्वचषक संघात वर्णी लागणार आहे. त्यात प्रमुख ‘या’पाच खेळाडूंवर बीसीसीआय निवड समितीची नजर असणार आहे.  

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

३० ऑगस्टपासून पाकिस्तान आणि नेपाळ यांच्यातील पहिल्या सामन्याने आशिया चषक स्पर्धेला सुरुवात होणार आहे. त्यानंतर पाकिस्तान श्रीलंकेला रवाना होईल, जिथे त्यांचा सामना टीम इंडियाशी होईल. याची दोन्ही देशांतील चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. जर के.एल. राहुल पहिल्या सामन्यात खेळला नाही तर इशान किशन प्लेइंग ११ मध्ये यष्टिरक्षक म्हणून सामील होऊ शकतो. वन डेत पहिल्यांदाच निवडलेल्या तिलक वर्मासाठीही ही स्पर्धा खास आहे. चला जाणून घेऊया अशा पाच खेळाडूंबद्दल जे आशिया कपमध्ये आहेत आणि त्यांची कामगिरी चांगली राहिली नाही तर ते विश्वचषक संघातून बाहेर होऊ शकतात.

कुलदीप यादव

कुलदीप यादव हा एक अनुभवी फिरकी गोलंदाज आहे जो आशियाई खेळपट्ट्यांवर चांगली कामगिरी करतो. कुलदीपने ८४ एकदिवसीय सामन्यांमध्ये १४१ विकेट्स घेतले आहेत, त्याचा सर्वोत्तम स्पेल ६/२५ आहे. आशिया कपमध्ये त्याला चहलपेक्षा पसंती देण्यात आली आहे. कुलदीपची एकदिवसीय क्रिकेटमध्ये ५.१६ इकॉनॉमी आहे. जर तो आशिया चषकात अपेक्षेप्रमाणे राहिला नाही तर त्याचे विश्वचषक संघात स्थान मिळणे फार कठीण होईल.

हेही वाचा: Ab De Villiers: एबी डिव्हिलियर्सने त्याचा खास मित्र कोहलीला दिला बटिंग ऑर्डर बदलण्याचा सल्ला; म्हणाला, “या जागेसाठी तो…”

तिलक वर्मा

हैदराबादमध्ये जन्मलेल्या तिलक वर्माने आयपीएलच्या या मोसमात प्रभावित केले, त्यानंतर वेस्ट इंडिजविरुद्धच्या त्याच्या पदार्पणाच्या T20I मालिकेत चांगली कामगिरी केली. वेस्ट इंडिजमधील खेळपट्ट्या गोलंदाजांना मदत करत होत्या पण तिथे तिलक वर्माने सर्वाना खूश केले. परिणामी, त्याची आशिया चषक संघात निवड झाली आहे, परंतु हे वेगळे (ODI) स्वरूप आहे आणि त्याची ही पदार्पण मालिकाही आहे. जर तिलक वर्मा प्लेइंग ११चा भाग असेल आणि त्याची कामगिरी खराब राहिली तर त्यांचे विश्वचषक खेळण्याचे स्वप्न यंदा अपूर्ण राहू शकते.

अक्षर पटेल

आयपीएलमध्ये अष्टपैलू खेळाडू म्हणून पटेलने छाप पाडली, जिथे दिल्लीचे आघाडीचे फलंदाज अपयशी ठरले तिथे तो तंबू ठोकून उभा होता. टी२० फॉरमॅटची चर्चा वेगळी आहे, अक्षर पटेलची भूमिका वन डेमध्ये मोठी असेल. जेव्हा गरज असेल तेव्हा त्याला डाव सांभाळावा लागेल आणि गोलंदाज म्हणून मधल्या फळीत धावांचा वेग रोखत विकेट्स घ्याव्या लागतील. अक्षरने ५२ एकदिवसीय सामन्यांमध्ये ५८ विकेट्स घेतल्या आहेत, त्याची इकॉनॉमी ४.५१ आहे. पटेलसाठी आशिया चषक स्पर्धेत चांगली कामगिरी करणे महत्त्वाचे असेल.

प्रसिद्ध कृष्ण

२७ वर्षीय प्रसाद कृष्णाने १४ एकदिवसीय सामने खेळले असून त्यात २५ विकेट्स घेतल्या आहेत. त्याची इकॉनॉमी ५.३२ आहे. बुमराह दुखापतीतून परतल्याने इतर वेगवान गोलंदाजांचीही महत्त्वाची ठरणार आहे. प्रसिद्ध कृष्णा हा आशिया चषकात महत्त्वाच्या वेगवान गोलंदाजांपैकी एक आहे, त्याला संधी मिळाल्यास त्याचा फायदा घ्यावा लागेल. कारण इथे तो अपयशी ठरला तर त्याच्यासाठी विश्वचषकात जाणे खूप कठीण होईल.

हेही वाचा: World Championships: भारताचा पोस्टर बॉय नीरज आणखी एका सुवर्ण पदकासाठी सज्ज, अंतिम फेरीत पाकिस्तानच्या अर्शदला देणार आव्हान

सूर्यकुमार यादव

स्फोटक फलंदाज सूर्यकुमार यादवने टी२० मध्ये आपले स्थान पक्के केले आहे, परंतु तो अद्याप एकदिवसीय सामन्यांमध्ये स्वत:ला सिद्ध करू शकलेला नाही. त्याच्याकडे टी२० खेळाडू म्हणून पाहिले जाते, त्यामुळे आशिया चषक एकदिवसीय फॉर्मेटमध्ये खेळला जाणार असल्याने त्याला चालणे आवश्यक आहे. विश्वचषकही एकदिवसीय फॉर्मेटमध्येच होणार असल्याने आशिया चषकात सूर्यकुमार यादवला या फॉरमॅटमध्ये स्वत:ला सिद्ध करावे लागणार आहे. सूर्याने आतापर्यंत खेळलेल्या २६ एकदिवसीय सामन्यांमध्ये १०१.३८च्या स्ट्राईक रेटने ५११ धावा केल्या आहेत. त्याची सरासरी २४.३३ आहे.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Team india will be selected for the world cup on the performance of the asia cup bcci will focus on these five players avw
Show comments