भारतीय संघाने आज रांची येथे ऑस्ट्रियाविरुद्धच्या तिसऱ्या सामन्यामध्ये पुलवामा हल्लानंतर शहीद झालेल्या सीआरपीएफच्या जवानांना आगळ्यावेगळ्या पद्धतीने श्रद्धांजली अर्पण केली. भारतीय संघातील सर्व खेळाडू हा समाना आर्मी कॅप घालून खेळणार आहेत. सामना सुरु होण्याआधी भारतीय संघाचा माजी कर्णधार महेंद्र सिंग धोनी याने या कॅप्सचे खेळाडूंना वाटप केले. बीसीसीआयने आपल्या ट्विटर हॅण्डलवरुन हा व्हिडीओ ट्विट केला आहे.

बीसीसीआयने केलेल्या ट्विटमधील व्हिडीओ कॅप्शनमध्ये, ‘पुलवामा हल्ल्यातील शहीद जवानांना श्रद्धांजली वाहण्याच्या उद्देशाने आज भारतीय खेळाडू आर्मी कॅप घालून मैदानात उतरणार आहेत. भारतीयांनी शहीद जवनांच्या मुलांच्या शिक्षणासाठी आणि नातेवाईकांसाठीच्या मदतनिधीमध्ये जास्तीत जास्त प्रमाणात देणगी द्यावी म्हणून हा उपक्रम राबवण्यात आला आहे’ असं म्हटलं आहे. या ट्विटच्या शेवटी बीसीसीआयने #JaiHind हा हॅशटॅगही वापरला आहे.

धोनीने खेळाडूंबरोबरच सहाय्यक स्टाफलाही हा कॅप्सचे वाटप केले. केदार जाधवने ही कॅप घेताना लष्करातील जवानांप्रमाणे कडकडीत सॅल्यूट केला. या आधी २४ फेब्रुवारी रोजी झालेल्या भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील पहिला टी २० सामन्यात भारतीय खेळाडूंनी काळ्या फिती बांधून व मैदानावर मौन पळून शहिदांना श्रद्धांजली वाहिली होती.

आज बीसीसीआयने आर्मी कॅप्सच्या माध्यमातून शहिदांना श्रद्धांजली वाहण्याबरोबरच भारतीयांनी शहिदांच्या कुटुंबियांना मदत करणाऱ्या मदतनिधीसाठीमध्ये आपले योगदान द्यावे हा संदेश दिला आहे. या खास आर्मी कॅप्सवर तयार केलेल्या या टोप्यांवर बीसीसीआयचा लोगो आहे. सर्वांना कॅप वाटप केल्यानंतर कोहलीने धोनीला कॅप दिली.

नाणेफेकीसाठी भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली हीच आर्मी कॅप घालून आला होता. विराटने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. पाच समान्यांच्या मालिकेमध्ये भारताने २-० अशी आघाडी मिळवली असून मालिकेमधील आव्हान टिकून ठेवण्यासाठी ऑस्ट्रेलियाला हा समाना जिंकावाच लागेल. तर दुसरीकडे भारतीय संघ हा सामना जिंकून मालिका विजयाच्या उद्देशानेच मैदानात उतरेल.

Story img Loader