India will get to play 12 matches to prepare for ODI World Cup 2023: भारत या वर्षी एकदिवसीय विश्वचषकाचे यजमानपद भूषवत असून, ४६ दिवस चालणाऱ्या या विश्वचषकात ४८ सामने खेळवले जाणार आहेत. ज्यामध्ये तीन बाद फेरीचे सामनेही खेळवले जाणार आहेत, ज्यामध्ये एकूण १० संघ यावेळी सहभागी होणार आहेत, एवढ्या मोठ्या स्पर्धेच्या तयारीसाठी टीम इंडियाला वर्ल्ड कपपूर्वी १२ वनडे खेळायला मिळू शकतात.

टीम इंडिया कधी आणि कोणाविरुद्ध खेळणार सामने –

सर्व प्रथम, १२ जुलैपासून सुरू होणाऱ्या वेस्ट इंडिज दौऱ्यावर टीम इंडिया २ कसोटी, ३ एकदिवसीय आणि ५ टी-२० सामने खेळणार आहे, ज्यामध्ये टीम इंडिया विश्वचषक मोहिमेची तयारी करताना दिसणार आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपनंतर भारतीय संघाने एक महिन्याचा ब्रेक घेतला आहे. आशिया चषक बद्दल बोलायचे तर ३१ ऑगस्ट पासून सुरु होणार आहे. आशिया चषक २०२३ यंदा एकदिवसीय फॉर्मेटमध्ये होणार आहे. ज्यामध्ये एकूण १३ सामने खेळले जातील. त्यापैकी टीम इंडिया जर अंतिम फेरीत पोहोचली तर ६ सामने खेळू शकते.

Constituent parties Shiv Sena and NCP in Mahayuti in Vasai are upset
वसईतील महायुतीमध्ये धुसफूस; शिवसेना, राष्ट्रवादी पक्ष नाराज
sneha chavan marathi actress got married for second time
लोकप्रिय मराठी अभिनेत्री दुसऱ्यांदा अडकली लग्नबंधनात; साधेपणाने पार…
How many hurdles in India way to host Olympics 2036
ऑलिम्पिक २०३६ आयोजनासाठी भारताच्या मार्गात किती अडथळे? सौदी, तुर्कीये, कतारचे आव्हान किती खडतर?
Prime Minister Narendra Modi and Union Home Minister Amit Shah in the state of Maharashtra to campaign for the assembly elections
नरेंद्र मोदी, अमित शहा आजपासून राज्यात; पंतप्रधानांच्या महाराष्ट्रात १० सभा
west pune vs east pune dispute over progress
‘पूर्व’ आणि ‘पश्चिम’ पुण्याचा वाद जुनाच
vanchit bahujan aaghadi manifesto for maharashtra vidhan sabha election 2024
विधानसभा निवडणुकीसाठी वंचितचे ‘जोशाबा समतापत्र’ प्रसिद्ध, नक्की काय म्हंटले त्यात !
Afro Asia Cup Set to Return After Almost Two Decades India and Pakistan Players Could Play in Same Team
Afro Asia Cup: भारत पाकिस्तानचे खेळाडू दोन दशकांनंतर एकाच संघातून खेळणार? लोकप्रिय क्रिकेट मालिकेबाबत मोठी अपडेट
Sunil Gavaskar Prediction on Border Gavaskar Trophy
Sunil Gavaskar : ‘टीम इंडिया ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४-० ने जिंकूच शकत नाही, जर जिंकली तर मला…’, भारतीय दिग्गजाचे मोठे वक्तव्य

आशिया चषक २०२३ स्पर्धेचे स्वरूप –

या स्पर्धेत सहभागी होणाऱ्या सहाही संघांची दोन गटात विभागणी करण्यात आली आहे. प्रत्येक गटातून दोन संघ सुपर फोर फेरीत प्रवेश करतील. आणि सुपर फोर फेरीतील अव्वल दोन संघांमध्ये अंतिम सामना खेळवला जाईल. या स्पर्धेत होणाऱ्या १३ सामन्यांपैकी चार सामने पाकिस्तानमध्ये आणि उर्वरित नऊ सामने श्रीलंकेत खेळवले जातील. आशिया चषक ३१ ऑगस्ट ते १७ सप्टेंबर दरम्यान होणार आहे. सविस्तर वेळापत्रक लवकरच जाहीर करण्यात येईल.

हेही वाचा – IND vs WI: वेस्ट इंडिज दौऱ्यानंतर अजिंक्य रहाणे इंग्लंडला जाणार, जाणून घ्या काय आहे कारण?

१५ वर्षांनंतर आशिया चषकाचे सामने पाकिस्तानात होणार आहेत. २००८ मध्ये पाकिस्तानने शेवटच्या आशिया कपचे यजमानपद भूषवले होते. तेव्हा श्रीलंका अंतिम फेरीत भारताचा पराभव करून चॅम्पियन बनला होता. त्या अंतिम सामन्यात प्रथम फलंदाजी करताना सनथ जयसूर्याच्या १२५ धावांच्या शतकी खेळीच्या जोरावर श्रीलंकेने ४९.५ षटकांत २७३ धावा केल्या. प्रत्युत्तरादाखल भारतीय संघ ३९.३ षटकांत १७३ धावांत सर्वबाद झाला आणि १०० धावांनी पराभूत झाला. या सामन्यात श्रीलंकेकडून अंजथा मेंडिसने ६विकेट घेतल्या. पुढे वनडे विश्वचषक असल्याने यंदाचा आशिया कप वनडे फॉरमॅटमध्ये खेळवला जाणार आहे.