Team India on Asia Cup: अजित आगरकर यांच्या नेतृत्वाखालील भारतीय निवड समिती आगामी आशिया चषक स्पर्धेसाठी १७ सदस्यीय संघ निवडण्याची शक्यता आहे. ५ ऑक्टोबरपासून सुरू होणाऱ्या एकदिवसीय विश्वचषकापूर्वी संभाव्य सर्व पर्यायांची चाचपणी करण्यासाठी हा निर्णय घेतला जाऊ शकतो. संघाच्या निवडीसाठी सोमवारी दिल्लीत बैठक होणार असून त्यात भारतीय क्रिकेट संघाचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविडही उपस्थित राहणार असल्याचेही मीडिया रिपोर्टमध्ये म्हटले आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
असा संघ निवडणे म्हणजे हे बीसीसीआयच्या परंपरेचे उल्लंघन ठरेल. कारण भारतीय प्रशिक्षक संघ निवड बैठकीला उपस्थित राहत नाहीत. रवी शास्त्री आणि अनिल कुंबळे हे राष्ट्रीय प्रशिक्षक असताना निवड समितीच्या बैठकांमध्ये सहभागी झाले नव्हते. ऑस्ट्रेलियन क्रिकेटमध्ये, मुख्य प्रशिक्षक हा राष्ट्रीय निवड समितीचा भाग असतो, परंतु भारतात प्रशिक्षक किंवा कर्णधार दोघांनाही निवड समितीच्या बैठकीत मत दिले जात नाही. कर्णधार रोहित शर्मा आणि द्रविड दोघेही बैठकीला उपस्थित राहतील की व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे सामील होतील हे अद्याप निश्चित झालेले नाही.
भारतीय संघातील मधल्या फळीतील दोन महत्त्वाचे खेळाडू लोकेश राहुल आणि श्रेयस अय्यर यांना त्यांचा फिटनेस सिद्ध करायचा आहे. शस्त्रक्रियेनंतर दोन्ही खेळाडूंनी एकही सामना खेळलेला नाही. अशा परिस्थितीत, बीसीसीआय अधिकारी आणि निवडकर्ते खबरदारीचा पर्याय निवडू शकतात, ज्यामुळे त्यांना पाच सामन्यांमध्ये सर्व उपलब्ध खेळाडूंची टेस्ट घेण्याची संधी मिळेल. आशियाई क्रिकेट परिषदेने आशिया चषक स्पर्धेसाठी १७ सदस्यीय संघाची तरतूद केली आहे. त्यामुळे पाकिस्तानने बांगलादेशने १७ सदस्यीय संघ निवडला आहे.
बीसीसीआयच्या एका सूत्राने सांगितले की, “विश्वचषक स्पर्धेसाठी १५ सदस्यीय तात्पुरत्या संघाची निवड होण्याची शक्यता आहे, जी ५ सप्टेंबरपर्यंत सादर करावी लागेल, परंतु अंतिम संघाची अंतिम मुदत २७ सप्टेंबर असल्याने त्यात बदल होऊ शकतात,” असे बीसीसीआयच्या सूत्राने सांगितले. आशिया चषकासाठी आणखी काही खेळाडूंची निवड होऊ शकते. के.एल. राहुलचा फिटनेस हा चांगला होत आहे, दुसरीकडे श्रेयस अय्यरने राष्ट्रीय क्रिकेट अकादमीमध्ये सराव सामन्यात ३८ षटके फलंदाजी केली आणि ५० षटके क्षेत्ररक्षण केले.
या बैठकीत डावखुरा फलंदाज तिलक वर्मा याच्याशी चर्चा केली जाईल, परंतु अय्यर आणि राहुल हे दोघेही तंदुरुस्त मानले गेले तर त्यांना प्लेइंग १५ मध्ये स्थान मिळेल की नाही हे अद्याप निश्चित नाही. संजू सॅमसनच्या बाबतीतही असेच आहे. त्याच्याऐवजी सूर्यकुमार यादवपेक्षा अधिक पसंती दिली जाऊ शकते. कारण सूर्यकुमार सॅमसनपेक्षा चांगला फिनिशर ठरू शकतो. दोन्ही प्रमुख खेळाडू (राहुल आणि अय्यर) तंदुरुस्त आणि निवडीसाठी उपलब्ध असल्यास, सूर्यकुमार अतिरिक्त फलंदाज म्हणून संघात राहू शकतो.
रविचंद्रन अश्विनचे नाव त्याच्या कौशल्याच्या जोरावर विश्वचषकात येत आहे. माजी राष्ट्रीय निवडकर्ता म्हणाला की, “अश्विनला कसोटी मालिकेनंतर वेस्ट इंडिजमध्ये राहण्यास आणि आगामी वन डे, टी२० क्रिकेटचा फॉर्म तपासण्यास का सांगू नये. जर तुम्ही अक्षरला चौथ्या क्रमांकावर खेळवू शकत असाल, तर अश्विनची चाचणी घेण्यासाठी तुम्ही त्याला का निवडू शकत नाही. तो भारतीय परिस्थितीत विरोधी संघासाठी धोकादायक ठरू शकतो. जर असे असेल तर त्याला आशिया चषकात लगेच का निवडले नाही?” असे प्रश्न विचारले.
भारताचा संभाव्य १७ सदस्यीय संघ: रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, विराट कोहली, के.एल. राहुल (यष्टीरक्षक, फिट असल्यास), श्रेयस अय्यर (फिट असल्यास), हार्दिक पांड्या (उपकर्णधार), रवींद्र जडेजा, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, कुलदीप यादव, इशान किशन, अक्षर पटेल, शार्दुल ठाकूर, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, युजवेंद्र चहल/आर. अश्विन.