India vs Sri Lanka, Gautam Gambhir on Arshdeep: श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेतील दुसऱ्या टी-२० सामन्यात भारतीय क्रिकेट संघाला दारुण पराभवाला सामोरे जावे लागले. या सामन्यात अष्टपैलू हार्दिक पांड्याने नाणेफेक जिंकून श्रीलंकेला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले. भारतीय गोलंदाजांची कामगिरी खराब राहिली आणि श्रीलंकेच्या फलंदाजांनी २०६ धावा केल्या. पुण्याच्या एमसीए स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या या सामन्यात भारताच्या पराभवाची अनेक कारणे समोर आली होती, मात्र माजी कर्णधार गौतम गंभीरलाही एका खेळाडूवर राग आला. अशा परिस्थितीत आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळू नये, असे त्याने स्पष्टपणे सांगितले.
गौतम गंभीर अर्शदीप सिंगवर भडकला
सामन्यानंतर गंभीरने स्टार स्पोर्ट्सवर सांगितले की, “जर तुम्ही दुखापतीनंतर येत असाल तर तुम्ही येताच आंतरराष्ट्रीय सामना खेळू शकत नाही. त्याआधी तुम्ही देशांतर्गत क्रिकेट खेळावे आणि फॉर्ममध्ये आल्यानंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये परत यावे, कारण नो बॉल कोणत्याही प्रकारे स्वीकारार्ह नाही. जे जखमी आहेत त्यांनी देशांतर्गत क्रिकेटमध्ये आधी चांगली कामगिरी करावी.
गंभीर पुढे म्हणाला, “क्षेत्ररक्षक चूक करू शकतो, फलंदाज खराब शॉट खेळू शकतो, गोलंदाज खराब चेंडू टाकू शकतो, पण एकही चेंडू अपरिहार्य नाही. नेटवर सराव करताना तुम्ही हे करत असाल. म्हणूनच तुम्ही सामन्यातही तेच करत आहात. या गोष्टींवर लक्ष देणे गोलंदाजी प्रशिक्षकावर अवलंबून आहे. सराव सत्रातही त्याला कणखर असायला हवे.
गौतम गंभीर पुढे बोलताना म्हणाला की, “प्रदीर्घ काळानंतर अर्शदीपचे अचानक प्लेईंग-११ मध्ये पुनरागमन हे त्याच्या अनियमित आणि लय नसलेल्या गोलंदाजीचे कारण होते. सात चेंडूंची कल्पना करा, ते २१ षटके टाकण्यासारखे आहे. प्रत्येकजण खराब चेंडू टाकतो किंवा खराब शॉट्स खेळतो, पण हे सर्व लयबद्दल आहे. जर तुम्ही दुखापतीनंतर येत असाल तर लगेच आंतरराष्ट्रीय सामने खेळू नका.”
“तुम्ही रणजी क्रिकेटमध्ये पुन्हा खेळायला हवे, तुमची लय परत मिळवा कारण नो-बॉल हा गुन्हा आहे ते अजिबातच मान्य नाहीत. जो कोणी दुखापतग्रस्त असेल किंवा विश्रांती घेतली असेल त्याला देशांतर्गत क्रिकेटमध्ये परत जावे लागेल, १५-२० षटके टाकावी लागतील, परत यावे आणि नंतर आंतरराष्ट्रीय सामना खेळावा लागेल. अर्शदीप सिंग आपल्या लयीत झुंजताना दिसत होता,” असे गंभीर म्हणाला. मालिकेतील तिसरा आणि शेवटचा टी२० सामना शनिवार, ७ जानेवारी रोजी होणार आहे.