भारतीय संघाचा खेळाडू शिखर धवन इंडियन प्रीमियर लीगमध्ये ( आयपीएल ) यंदाच्या हंगामात पंजाब किंग्जचं नेतृत्व करताना दिसणार आहे. गेल्यावर्षी बांग्लादेश दौऱ्यानंतर शिखर धवनला भारतीय संघातून वगळण्यात आलं होतं. पण, आयपीएलमध्ये आक्रमक खेळी करत भारतीय संघात पुनरागमन करण्याची शिखर धवनला संधी असणार आहे. अशात शिखर धवनने आपल्या वैयक्तिक आयुष्याबद्दल भाष्य केलं आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

२०१९ साली शिखर धवनची पत्नी आयशा मुखर्जीने नऊ वर्षाचं नात संपवण्याचा निर्णय घेतला होता. सध्या धवन आणि आयशा मुखर्जी यांच्या घटस्फोटाचं प्रकरण न्यायालयात सुरू आहे. पण, लग्न मोडण्यास आपणच जबाबदार असल्याचं शिखर धवनने सांगितलं आहे.

हेही वाचा :  कॅपिटल्सची कर्णधार मेग लॅनिंगचे सूचक विधान

“मी अपयशी झालो, कारण माणूस कोणताही निर्णय घेतो, तेव्हा त्याचा शेवटचा निर्णय असतो. मला दुसऱ्यांवर बोट दाखवायला आवडत नाही. मी अपयशी ठरलो, कारण मला त्या क्षेत्राचा अंदाज नव्हता. क्रिकेटबद्दल मी आज बोलत आहे, ते २० वर्षापूर्वी मला विचारलं असतं, तर सांगता आलं नसतं. हे सर्व अनुभवाचे बोल आहेत. त्यामुळे पहिल्यांदा एक-दोन वर्ष एकत्र घालवा, नंतर दोघांचं संस्कार जुळतात का नाही हे पाहा,” असं शिखर धवनने म्हटलं आहे.

हेही वाचा : २०११ च्या विश्वचषक विजेत्या संघाच्या खेळाडूंनी ऋषभ पंतची भेट, रैना-श्रीशांतने शेअर केली भावनिक पोस्ट

“सध्या घटस्फोटाचं प्रकरण न्यायालयात सुरू आहे. याचा वाद संपल्यानंतर जेव्हा लग्न करायचं… तेव्हा मी अधिक समंजस्य झालो असेल, की मला कसा जोडीदार हवा आहे… आणि मग त्याच्याशी लग्न करू शकेल. २६-२७ व्या वर्षी क्रिकेट खेळत असताना मी प्रेम प्रकरणात पडलो नव्हतो. पण, जेव्हा प्रेमात पडलो, तेव्हा धोक्याची घंटा ओळखली नाही. आता प्रेमात पडलो, तर धोक्यांची घंटा ओळखू शकतो. जर, धोक्याची घंटा असेल, तर प्रेम प्रकरणातून बाहेर पडणार,” असं शिखर धवनने सांगितलं आहे. तो ‘आज तक’शी बोलत होता.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Team indian cricketer shikhar dhawan stetement on divorce ayesha mukherjee and second marriage ssa