ऑस्ट्रेलियाविरुद्ध वन-डे सामन्यांच्या मालिकेत भारताने २-० ने आघाडी घेतल्यानंतर, शुक्रवारी रांचीच्या मैदानात दोन्ही संघ समोरासमोर येणार आहेत. धोनीच्या घरच्या मैदानावर हा सामना रंगणार असल्यामुळे त्याच्या कामगिरीकडेही सर्वांचं लक्ष असणार आहे. या सामन्याआधी सरावादरम्यान भारतीय संघातल्या खेळाडूंनी उंच षटकार खेचण्याचा सराव केला. धोनी, रायुडू, शिखर धवन आणि चहल या खेळाडूंनीही या सरावात भाग घेतला. बीसीसीआयने भारतीय संघाच्या या षटकार सरावाचा व्हिडीओ आपल्या ट्विटर अकाऊंटवर शेअर केला आहे.

पहिल्या दोन्ही सामन्यांमध्ये भारताने ऑस्ट्रेलियाला चांगलंच झुंजवत बाजी मारली आहे. मात्र फलंदाजी हा भारतीय संघासाठी नेहमीच चिंतेचा विषय ठरला आहे. फलंदाजांच्या कामगिरीत सातत्य नसल्यामुळे अनेकदा भारतीय संघ मैदानात अडचणीत सापडला आहे. त्यामुळे भारतीय खेळाडूंनी फलंदाजीचाही कसून सराव केला.

तिसरा सामना जिंकून भारताला या मालिकेत विजयी आघाडी घेण्याची संधी आहे. त्यामुळे मैदानात केलेला षटकारांचा सराव भारताला प्रत्यक्ष सामन्यात किती फायदेशीर ठरतो हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

अवश्य वाचा – भारतीय संघाने घेतला धोनीच्या घरी पाहुणचार, सोशल मीडियावर फोटो व्हायरल

Story img Loader