Vikram Rathore on Virat Kohli : दक्षिण आफ्रिकेविरुद्ध सेंच्युरियनमध्ये सुरू असलेल्या पहिल्या कसोटीच्या पहिल्या डावात सीनियर फलंदाज विराट कोहली मोठी खेळी करू शकला नाही. यानंतर किंग कोहली कमी सरावामुळे मोठी इनिंग खेळण्यात अपयशी ठरला का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. आता टीम इंडियाचे फलंदाजी प्रशिक्षक विक्रम राठोड यांनी यावर मजेशीर उत्तर दिले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

भारतीय संघाचे फलंदाजी प्रशिक्षक विक्रम राठोड यांनी स्पष्टपणे सांगितले की, कारकिर्दीच्या या टप्प्यावर माजी कर्णधार विराट कोहलीला जास्त सरावाची गरज नाही. प्रिटोरियातील ‘टक्स ओव्हल’ येथे खेळल्या गेलेल्या तीन दिवसीय ‘आंतर-संघ’ सराव सामन्यातही कोहलीने भाग घेतला नव्हता. इंग्लंडमध्ये कुटुंबासोबत वेळ घालवण्यासाठी त्यांनी चार दिवसांची रजा आधीच घेतली होती. सेंच्युरियनच्या उसळत्या खेळपट्टीवर कोहली चांगल्या फॉर्ममध्ये दिसत होता, पण वेगवान गोलंदाज कागिसो रबाडाच्या बाहेर जाणार्‍या चेंडूवर तो झेलबाद झाला. पावसाने प्रभावित झालेल्या पहिल्या दिवसाचा खेळ भारताने आठ विकेट्सवर २०८ धावांवर संपवला.

दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या दिवसानंतर राठोड म्हणाले, “विराट कोहली करिअरच्या ज्या टप्प्यावर आहे, मला वाटत नाही की त्याला जास्त सरावाची गरज आहे. तो अनेकदा चांगली फलंदाजी करतो आणि भरपूर सरावही करतो. त्याने काही दिवस कमी सराव केला तरी फरक पडत नाही. आजही तो किती चांगली फलंदाजी करत होता, हे आपण पाहिलं. त्याच्या खेळीवरून असे वाटत नव्हते की तो जवळपास सहा महिन्यांनंतर कसोटी सामना खेळत आहे.”

हेही वाचा – Year Ender 2023 : शुबमन की विराट? या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये कोणत्या फलंदाजाने झळकावली सर्वाधिक शतके

केएल राहुलने पुन्हा एकदा भारताला कठीण परिस्थितीतून बाहेर काढले आणि प्रशिक्षकानेही कबूल केले की तो या संघाचा समस्यानिवारक आहे. तो म्हणाला, “राहुल आमच्यासाठी समस्यानिवारक ठरत आहे. संघाला कठीण परिस्थितीतून बाहेर काढण्यात तो अनेकवेळा यशस्वी ठरला आहे. तो त्याच्या खेळाच्या रणनीतीबद्दल स्पष्ट आहे. चांगल्या चेंडूवर स्वत:चा बचाव कसा करायचा आणि कमकुवत चेंडूंवर धावा कशा करायच्या हे त्याला माहीत आहे.”

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Team indias batting coach vikram rathore says at the stage virat kohli is in his career i do not think he needs much practice vbm
Show comments