भारतीय क्रिकेट संघाचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री आपल्या हटके अंदाजासाठी ओळखले जातात. त्यांचा बिनधास्तपणा, संघटन कौशल्य आपल्या सर्वांना माहीतच आहे. पण, इंग्लंडमध्ये त्यांनी अशी एक गोष्ट केली, जी सोशल मीडियावर सर्वत्र व्हायरल झाली. शास्त्रींनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून एक व्हिडिओ शेअर केला, ज्यात त्यांनी साऊथम्प्टन येथील मैदानात एका श्वानाला प्रशिक्षण दिले.

भारतीय संघाच्या सराव सत्रानंतर क्युरेटर सिमॉन ली यांच्या श्वानाला शास्त्रींनी प्रशिक्षण दिले. याचा एक मजेशीर व्हिडिओ शास्त्री यांनी आपल्या ट्विटर हँडलवर व्हिडिओ पोस्ट केला. “आमचा मित्र विन्स्टनने टीम इंडियाच्या सराव सत्रानंतर टेनिस बॉलसह सराव केला”, असे कॅप्शन शास्त्रींनी या व्हिडिओला दिले आहे.

 

हेही वाचा – मोठी बातमी..! वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपसाठी १५ सदस्यीय भारतीय संघाची घोषणा

या व्हिडिओमध्ये भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली किट बॅग घेऊन उभा असल्याचे दिसत आहे. व्हिडिओमध्ये, शास्त्री हातात टेनिस रॅकेटने चेंडूला वेगवेगळ्या दिशेने मारत आहेत. त्यानंतर हा चेंडू श्वान त्यांना आणून देत आहे.

शास्त्री सध्या टीम इंडियासोबत वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यासाठी इंग्लंडला आहेत. १८ जून ते २२ जून यादरम्यान भारत आणि न्यूझीलंड यांच्यात हा सामना रंगणार आहे.