Video of Team India with local players in Barbados: टीम इंडिया सध्या वेस्ट इंडिज दौऱ्यावर आहे. भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात १२ जुलैपासून कसोटी मालिका सुरुवात होणार आहे. या मालिकेसाठी टीम इंडिया वेस्ट इंडिज दौऱ्यावर आहे. भारतीय खेळाडू सध्या बार्बाडोसमध्ये आहेत. येथे संघाने सराव सुरू केला आहे. बार्बाडोसच्या सरावात स्थानिक खेळाडू टीम इंडियाला मदत करत आहेत. अलीकडेच भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने एक मनोरंजक व्हिडिओ शेअर केला आहे. यामध्ये भारतीय खेळाडू स्थानिक खेळाडूंना ऑटोग्राफ देताना दिसत आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

वास्तविक भारतीय संघ अजूनही बार्बाडोसमध्ये आहे. येथे भारतीय संघाने सराव सामना खेळला. बार्बाडोसच्या स्थानिक खेळाडूंनी सराव सत्रात खूप मदत केली. बीसीसीआयने एक मजेशीर व्हिडिओ शेअर केला आहे. यामध्ये भारतीय खेळाडू ऑटोग्राफ देताना दिसत आहेत. मोहम्मद सिराजने आपले शूज एका खेळाडूला भेट दिले. यासोबतच दुसऱ्या एका खेळाडू बॅट भेट दिला. त्याचबरोबर रोहित आणि कोहलीने अनेक चाहत्यांना ऑटोग्राफ दिले. यादरम्यान रविचंद्रन अश्विन, अजिंक्य रहाणे आणि ऋतुराज गायकवाडही दिसले.

भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील कसोटी मालिकेतील पहिला सामना डॉमिनिका येथे होणार आहे. या सामन्यापूर्वी टीम इंडियाने बार्बाडोसमध्ये सराव सामना खेळला होता. यात यशस्वी जैस्वाल आणि रोहित शर्मा यांनी चमकदार कामगिरी केली. तर विराट कोहली काही विशेष करू शकला नाही. जयदेव उनाडकटने चांगली गोलंदाजी केली. त्याच्यासह संघातील इतर गोलंदाजांनीही चांगलाच घाम गाळला.

हेही वाचा – MS Dhoni Birthday: धोनीच्या वाढदिवसाला ऋषभ पंतने जिंकली चाहत्यांची मनं, पाहा कसा साजरा केला माहीचा बर्थडे?

भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेनंतर तीन एकदिवसीय आणि पाच टी-२० सामन्यांची मालिका खेळवली जाणार आहे. २७ जुलैपासून वनडे मालिकेला सुरुवात होणार आहे. हा सामना बार्बाडोसमध्ये होणार आहे. यानंतर ३ ऑगस्टपासून टी-२० मालिका खेळवली जाणार आहे. त्यांचा पहिला सामना त्रिनिदाद येथे होणार आहे.

वेस्ट इंडिजविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी भारतीय संघ –

रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, ऋतुराज गायकवाड, विराट कोहली, यशस्वी जैस्वाल, अजिंक्य रहाणे (उपकर्णधार), केएस भारत (यष्टीरक्षक), इशान किशन (यष्टीरक्षक), आर अश्विन, रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, अक्षर पटेल, मोहम्मद सिराज, मुकेश कुमार, जयदेव उनाडकट आणि नवदीप सैनी.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Team indias mohammad siraj shared a video of him gifting boots and bats to local players in barbados vbm