Team India World Cup 2023 Jersey: पुढील महिन्यापासून मायदेशात होणाऱ्या आयसीसी एकदिवसीय विश्वचषकासाठी आदिदास (Adidas) ने टीम इंडियाच्या नवीन जर्सीचे अनावरण केले आहे. प्रसिद्ध भारतीय गायक रफ्तार यांनी गायलेल्या ‘३ का ड्रीम’ या गाण्याद्वारे बहुप्रतिक्षित जर्सी रिलीज करण्यात आली. ‘ड्रिम ऑफ ३’ हे लाखो चाहत्यांचे प्रतीक आहे जे भारतीय संघाला १९८३ आणि २०११ नंतर तिसरा एकदिवसीय विश्वचषक जिंकताना पाहण्याचे स्वप्न सत्यात उतरण्याची आतुरतेने वाट पाहत आहेत.

विश्वचषकासाठी भारतीय क्रिकेट संघाची नवी जर्सी लाँच करण्यात आली आहे. टीम इंडियाचे अधिकृत किट प्रायोजक आदिदासने बुधवारी (२० सप्टेंबर) एक व्हिडीओ शेअर केला. यामध्ये कर्णधार रोहित शर्मासोबत अनुभवी फलंदाज विराट कोहली, उपकर्णधार हार्दिक पांड्या, मोहम्मद सिराजसह अनेक खेळाडू दिसले. ५ ऑक्टोबरपासून भारतात विश्वचषक स्पर्धा होणार आहे. अंतिम सामना १९ नोव्हेंबर रोजी होणार आहे.

Shubman Gill ruled out of first Test match in Perth because of fractured thumb IND vs AUS Border Gavaskar Trophy
IND vs AUS: शुबमन गिल ऑस्ट्रेलियाविरूद्ध पहिल्या कसोटीतून बाहेर, टीम इंडियाच्या अडचणी वाढल्या, ‘हा’ खेळाडू करणार पदार्पण?
Eknath Shinde on Ladki Bahin Yojana Sixth installment
महायुतीला सत्ता मिळाली, लाडक्या बहिणींना २१०० रुपये कधीपासून…
IPL 2025 Mega Auction Jofra and Archer Cameron Green not shortlisted
IPL 2025 : जोफ्रा आर्चर-बेन स्टोक्ससह ‘या’ पाच दिग्गज खेळाडूंवर महालिलावात लागणार नाही बोली, जाणून घ्या कारण
Axar Patel Stunning Catch of David Miller Reminds South Africa T20 World Cup 2024 Suryakumar Yadav IND vs SA 3rd T20I Watch Video
Axar Patel Catch: अक्षर पटेलने टिपला मिलरचा ‘सूर्या दादा स्पेशल कॅच’, सीमारेषेवर हवेत झेल घेत असा फिरवला सामना ; VIDEO व्हायरल
Suryakumar Yadav video with Pakistani fan goes viral :
Suryakumar Yadav : तुम्ही चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी पाकिस्तानात का येत नाही? चाहत्याच्या प्रश्नावर सूर्या म्हणाला, ‘हे आमच्या…’
Team India Performance in Border Gavaskar Trophy played at Australia
Team India : टीम इंडियाची ऑस्ट्रेलियामध्ये कामगिरी खूपच निराशाजनक, तब्बल ‘इतक्या’ वेळा बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीत पत्करावा लागलाय पराभव
Mumbai Indians will buy five of their old players for IPL 2025
Mumbai Indians : मुंबई इंडियन्स विक्रमी सहाव्यांदा जेतेपद पटकावण्यासाठी ‘या’ पाच जुन्या शिलेदारांवर लावणार बोली, जाणून घ्या कोण आहेत?

जर्सीवर तिरंग्याचे दोन स्टार आणि तीन रंग

आदिदासने जर्सीमध्ये बदल काही केले आहेत. खांद्यावरच्या तीन पांढऱ्या पट्ट्यांच्या जागी त्यांनी तिरंग्याच्या तीन रंगांचा समावेश केला आहे. छातीच्या डाव्या बाजूला बीसीसीआयच्या लोगोवर आता दोन स्टार आहेत, जे भारताच्या एकदिवसीय विश्वचषक विजयाचे प्रतीक आहे. ते दोन स्टार म्हणजे १९८३ आणि २०११चा विश्वचषक विजयाची खुण आहे.

भारताचा पहिला सामना ऑस्ट्रेलियाशी होणार आहे

भारतीय संघ ८ ऑक्टोबर रोजी चेन्नई येथे ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या विश्वचषकात आपल्या मोहिमेची सुरुवात करणार आहे. टीम इंडिया १४ ऑक्टोबरला अहमदाबादमध्ये पाकिस्तानविरुद्ध खेळणार आहे. विश्वचषकापूर्वी भारतीय संघ ऑस्ट्रेलियाविरुद्ध तीन सामन्यांची वन डे मालिका खेळणार आहे.

हेही वाचा: Asian Games 2023: भारतीय अ‍ॅथलेटिक्स आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी सज्ज! सुवर्णपदक जिंकण्याचे कोण आहेत आघाडीचे दावेदार? जाणून घ्या

आयसीसीने विश्वचषक २०२३चे अधिकृत गीत जाहीर केले

आयसीसी पुरुष क्रिकेट विश्वचषक २०२३ सुरू होण्यासाठी अवघे काही दिवस शिल्लक असताना, आयसीसीने या मोठ्या इव्हेंटचे अधिकृत गीत ‘दिल जश्न बोले’ जारी केले आहे. हे राष्ट्रगीत प्रख्यात बॉलिवूड संगीतकार प्रीतम यांनी संगीतबद्ध केले आहे. यामध्ये अभिनेता रणवीर सिंगची उपस्थिती आकर्षणात भर घालत आहे. तसेच, यात भारतीय संघाचा स्टार फिरकीपटू युजवेंद्र चहलची पत्नी धनश्री वर्मा देखील डान्स करताना दिसत आहे.

हेही वाचा: Sanju Samson: सॅमसनला ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेतून वगळल्याने इरफान पठाण नाराज; म्हणाला, “मी त्याच्या जागी असतो तर…”

आगामी विश्वचषक २०२३साठी भारतीय संघ

रोहित शर्मा (कर्णधार), हार्दिक पांड्या (उपकर्णधार), शुबमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, के.एल. राहुल (विकेटकीपर), रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, कुलदीप यादव, मोहम्मद शमी, अक्षर पटेल, इशान किशन (विकेटकीपर), सूर्यकुमार यादव.