खेळाडूसाठी वैयक्तिक कामगिरीपेक्षा सांघिक कामगिरी अधिक महत्त्वाची असते, असे मत भारतीय संघात पुन्हा स्थान मिळवण्यासाठी झगडणाऱ्या सलामीवीर वीरेंद्र सेहवागने व्यक्त केले आहे. संघाच्या यशात माझे योगदान असते, तेव्हा मला अतिशय आनंद होतो, असे सेहवागने सांगितले.
‘‘माझे द्विशतक झळकल्यानंतर संघ हरण्यापेक्षा माझ्याकडून ४० किंवा ५० धावा झाल्यावरही संघ जिंकला, तर मला आनंद होतो,’’ असे सेहवागने सांगितले.
घरच्या मैदानावर झालेल्या ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी मालिकेतील दोन सामन्यांत सेहवागला फक्त २७ धावा करता आल्या होत्या. नोव्हेंबर महिन्यात भारतीय संघ वेस्ट इंडिज संघाविरुद्ध दोन कसोटी सामन्यांची मालिका खेळणार आहे. या मालिकेच्या निमित्ताने भारतीय कसोटी संघात पुनरागमनासाठी सेहवाग उत्सुक आहे.