निर्णय समीक्षा प्रणालीवर(डीआरएस) माजी पंच बोमी जामुला यांचे मत
आंतराष्ट्रीय क्रिकेटमधील माजी पंच बोमी जामुला यांनी सामन्यात निर्णय समीक्षा प्रणालीसुद्धा कधीकधी अपयशी ठरू शकते किंवा चुकीचे निर्णय देऊ शकते असे मत व्यक्त केले. सामन्यात पायचित होण्याचा निर्णय डीआरएस प्रणालीवरून देण्यात येतो. इंग्लंडमध्ये सुरू असलेली अॅशेस मालिकेत डीआरएस प्रणालीवरून देण्यात आलेल्या निर्णयावरून समीक्षा प्रणालीच्या अचूकतेवर शंका उपस्थित करणारा मुदद्दा उपस्थित झाला. त्यावर माजी पंच बोमी जामुला यांनी तंत्रज्ञानही कधीकधी निर्णय देण्यात अपयशी ठरू शकते असे म्हटले आहे. तसेच “डीआरएस प्रणालीही संपुर्णपणे तंत्रज्ञानावर अवलंबून आहे की, जी बहुतेकवेळा अचूक निर्णय देते. परंतु तंत्रज्ञानही कधीकधी चुकीचे ठरू शकते. उदाहरणार्थ नव्या कारच्या बाबतीत जसे ती प्रत्येकवेळा व्यवस्थित चालू होते. परंतु कधीतरी त्या कारमध्येही बिघाड होतो. अशाच प्रकारचे डीआरएस हे तंत्रज्ञान आहे. त्यामुळेते प्रत्येकवेळी बरोबरच असेल असे नाही.  असेही बोमी जामुला यांनी स्पष्ट केले.

Story img Loader