South Africa captain Temba Bavuma’s press conference Updates: आयसीसी एकदिवसीय विश्वचषक २०२३ मधील ३७वा सामना रविवारी भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात कोलकाता येथे खेळला जाणार आहे. या सामन्यापूर्वी म्हणजेच शनिवारी दक्षिण आफ्रिका संघाचा कर्णधार टेम्बा बावुमाची पत्रकार परिषद पार पडली. या पत्रकार परिषदेत टेम्बा बावुमा म्हणाला, आमचा संघ ईडन गार्डनवर खेळण्यासाठी खूप उत्सुक आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
या मैदानाचा स्वतःचा इतिहास आहे आणि येथे भारताविरुद्ध खेळणे मनोरंजक असेल. भारतासारख्या संघाविरुद्ध आत्मपरीक्षण करण्यास आम्ही उत्सुक आहोत. तो म्हणाला, भारतीय परिस्थितीसाठी भारताकडे जागतिक दर्जाचे गोलंदाजी आक्रमण आहे, आम्ही आमचे सर्व तळ कव्हर करू आणि तयारीमध्ये कोणतेही कमी राहणार नाही याची काळजी घेऊ.
गोलंदाज हे आव्हान असेल, पण आम्हाला आमचा सर्वोत्तम खेळ दाखवावा लागेल –
दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार म्हणाला, “भारतीय गोलंदाज जास्त सैल चेंडू टाकत नाहीत, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, मोहम्मद शमी हे सर्वच आक्रमक गोलंदाज आहेत. त्यांच्याविरुद्ध नवीन चेंडूवर धावा करणे सोपे नाही, पॉवरप्लेमध्ये काळजीपूर्वक आधी त्यांना खेळावे लागेल.” तो पुढे म्हणाला, “या व्यतिरिक्त फिरकीपटू कुलदीप यादवने मधल्या षटकांमध्ये विकेट्स घेतल्या आहेत. रवींद्र जडेजा आणि कुलदीप एकत्र गोलंदाजी करत आहेत. या दोघांविरुद्ध मधल्या षटकांमध्ये फलंदाजी करणे आव्हानात्मक असेल. जरी आम्ही फिरकीपटू चांगले खेळत आहोत, परंतु त्यांचे गोलंदाजी आक्रमण इतरांपेक्षा चांगले आहे आणि आम्हाला आमचा सर्वोत्तम खेळ दाखवावा लागेल.”
हेही वाचा – प्रसिद्ध क्रिकेट समालोचक आकाश चोप्राला घातला ३३ लाख रुपयांचा गंडा, जाणून घ्या काय आहे प्रकरण?
स्वतःच्या फॉर्मवरही दिले उत्तर –
या स्पर्धेत आत्तापर्यंत बावुमाने पाच डावात केवळ १११ धावा केल्या आहेत. बावुमाला त्याच्या खराब फॉर्मबद्दल विचारले असता, बावुमा म्हणाला, “तुम्हाला नेहमीच संघासाठी योगदान द्यायचे असते. सध्या इतर फलंदाज जबरदस्त फॉर्ममध्ये आहेत, मी काही भागीदारी केल्या आहेत.पण मला मोठी खेळी खेळायची आहे.” तो पुढे म्हणाला, “स्वत:वर आत्मविश्वास कायम ठेवण्याची गरज आहे आणि मी लवकरच चांगली खेळी खेळेन, स्पर्धेत अजून बरेच क्रिकेट बाकी आहे आणि मला खात्री आहे की मी लवकरच योगदान देईन.”
हेही वाचा – World Cup 2023: प्रसिध कृष्णा पाठोपाठ ‘या’ स्टार खेळाडूला लागली लॉटरी, बीसीसीआयने उपकर्णधारपदी केली नियुक्ती
दोन फिरकीपटूंसोबत जाऊ शकतो –
दक्षिण आफ्रिकेला मोठ्या सामन्यांमध्ये पराभवाचा ‘चोकर्स’ म्हणून संबोधले जात होते, परंतु यावेळी आपल्या कामगिरीने हा संघ विजेतेपदाचा प्रबळ दावेदार म्हणून समोर आला आहे. फिरकीपटूंना मदत करणाऱ्या ईडनच्या खेळपट्टीवर संघाच्या रचनेबद्दल विचारले असता तो म्हणाला, “मी अद्याप विकेट पाहिली नाही, गरज पडल्यास आम्ही दोन्ही फिरकीपटूंना मैदानात उतरवू, परिस्थिती लक्षात घेऊन संघ रचना ठरवली जाईल.”