Temba Bavuma Thumb Stuck in Helmet Video: डरबनमधील किंग्समीड येथे सुरू असलेल्या श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यावर दक्षिण आफ्रिकेने आपली पकड पूर्णपणे घट्ट केली आहे. यजमान संघाची एकूण आघाडी ४५० च्या पुढे गेली असून त्यांच्याकडे अजूनही ७ विकेट शिल्लक आहेत. आफ्रिकन संघाला या स्थानावर आणण्यात गोलंदाजांनी महत्त्वाची भूमिका बजावली पण कर्णधार टेम्बा बावुमाची भूमिकाही खूप महत्त्वाची होती. टेम्बा बावुमाने २०२ चेंडूत ९ चौकारांसह आपले तिसरे कसोटी शतक पूर्ण केले. पण या शतकी खेळीदरम्यान टेम्बा बावुमाचा एक भन्नाट व्हीडिओ व्हायरल झाला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

बावुमाने पहिल्या डावात ११७ चेंडूत ९ चौकार आणि एक षटकाराच्या मदतीने ७० धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली आणि त्यानंतर दुसऱ्या डावातही अर्धशतक झळकावून आफ्रिकन संघाला मोठी आघाडी मिळवून दिली आहे. मात्र, त्याच्या फलंदाजीदरम्यान एका मजेशीर घटनेमुळे तो चर्चेचा विषय ठरला आहे.

हेही वाचा – VIDEO: क्रिकेट विश्वात पसरली शोककळा, महाराष्ट्राच्या क्रिकेटपटूचा मैदानातच मृत्यू; कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना

सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये टेम्बा बावुमाचा हेल्मेट सरळ करत असताना अंगठा हेल्मेटमध्ये घालतो आणि तेव्हा त्याचा अंगठा ग्रिलमध्ये अडकतो. टेम्बा बावुमाची ही मजेशीर घटना कॅमेऱ्यात कैद झाली आहे. बावुमा हेल्मेटच्या ग्रीलमध्ये अडकलेला अंगठा सोडवण्याचा प्रयत्न करत असतो, हेही या व्हीडिओमध्ये दिसत आहे. बावुमाचा हा व्हीडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

हेही वाचा – Champions Trophy: “२६/११ च्या दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तान…”, शाहीद आफ्रिदीने BCCI ला सुनावलं, चॅम्पियन्स ट्रॉफीच्या मुद्द्यावरून मोठं वक्तव्य

बावुमाने पहिल्या डावात ७० धावांच्या खेळीत हवेत उडी घेत एक उत्कृष्ट षटकार लगावला होता, याचाही व्हीडिओ सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला आहे. टेम्बा बावुमा उंची लहान असला तरी तो एक आक्रमक फलंदाज आहे. इतर फलंदाजांप्रमाणे टेम्बाच्या क्रिकेट शॉट्समध्ये एकापेक्षा एक कमाल शॉट्स आहेत. बावुमाने हवेत उडी घेत पॉइंटच्या दिशेने उत्कृष्ट षटकार मारला. याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून चाहते त्याचे कौतुक करत आहेत.

हेही वाचा – Glenn Phillips Flying Catch: क्रिकेटमधील सर्वाेत्कृष्ट झेल? ‘सुपरमॅन’ फिलीप्सने हवेत झेप घेत टिपला अनपेक्षित कॅच, VIDEO व्हायरल

श्रीलंका-दक्षिण आफ्रिका यांच्यातील पहिल्या कसोटीतील पहिल्या डावात १९१ धावा केल्यानंतर आफ्रिकन संघाने गोलंदाजीत कहर केला. मार्को यानसेनच्या उत्कृष्ट गोलंदाजीसमोर श्रीलंकेचा संघ १३.५ षटकांत अवघ्या ४२ धावांत ऑलआऊट झाला, ही त्यांची कसोटी डावातील सर्वात कमी धावसंख्या आहे. दक्षिण आफ्रिकेला पहिल्या डावात १४९ धावांची मोठी आघाडी मिळाली. या आघाडीच्या जोरावर आता आफ्रिकेचा संघ ५०० अधिक धावसंख्येची आघाडी उभारण्याच्या दिशेने धावा करत आहे.