रविवारी संपलेल्या प्रो-कबड्डी लीगमध्येसुद्धा याचाच प्रत्यय आला. या स्पध्रेत भारतातील दहा खेळाडूंनी चढायांच्या गुणांचे शतक झळकावले आहे. यात अव्वल दोन स्थानांवर असलेल्या यु मुंबाचा कर्णधार अनुप कुमार आणि तेलुगू टायटन्सचा राहुल चौधरी यांनी दीडशतकी मजल मारली आहे. महाराष्ट्राच्या फक्त नितीन मदनेला हे शतक साकारता आले आहे. याशिवाय भारताच्या आठ क्षेत्ररक्षकांना पकडीचे तीसहून अधिक गुण मिळवता आले आहेत. बंगळुरू बुल्सचा कप्तान मनजित चिल्लर या एकमेव खेळाडूने पकडींच्या गुणाचे अर्धशतक साकारून अग्रस्थान मिळवले आहे. जयपूर पिंक पँथर्सकडून खेळणाऱ्या महाराष्ट्राच्या प्रशांत चव्हाणला पकडींचे ३१ गुण मिळवण्यात यश आले आहे.
प्रो-कबड्डीत दहा चढाईपटूंची शतके
क्रिकेट हा जसा फलंदाजांचा खेळ म्हटला जातो, तसाच कबड्डी हा नेत्रदीपक चढायांनी गुण मिळवणाऱ्या चढाईपटूंचा खेळ असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.
First published on: 02-09-2014 at 01:39 IST
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ten attackers players make point centuries in pro kabaddi league