भारताचा क्रिकेट विक्रमवीर सचिन तेंडुलकर कोण, हे मला माहीत नाही, अशी अनभिज्ञता प्रकट करणाऱ्या रशियन टेनिसपटू मारिया शारापोव्हा हिच्यावर सचिनच्या चाहत्यांनी सोशल मीडियावर कडाडून टीका केली आहे.
विम्बल्डन टेनिस स्पर्धा पाहण्यासाठी सचिन तेथे गेला होता. त्या वेळी इंग्लंडचा माजी कर्णधार अॅन्ड्रय़ू स्ट्रॉस, इंग्लंडचा फुटबॉलपटू डेव्हिड बेकहॅम यांच्यासमवेत त्याला आलिशान कक्षात बसण्याची संधी मिळाली होती. एका बातमीदाराने शारापोव्हा हिला ‘‘तू सचिनला ओळखते काय?’’ असे विचारले असता, ‘‘सचिनला मी ओळखत नाही,’’ असे तिने उत्तर दिले होते. तिच्या या उत्तरामुळे सचिनच्या चाहत्यांमध्ये तीव्र नाराजी पसरली. पन्नास हजारहून जास्त लोकांनी शारापोव्हावर टीका केली आहे.
सचिनच्या एका चाहत्याने शारापोव्हा हिला सचिनविषयी सविस्तर माहिती पाठविली आहे व ही माहिती व्यवस्थित वाचून घे असे सुचविले आहे. शारापोव्हाने या टीकांवर कोणतीही टिप्पणी केलेली नाही.
सचिनच्या चाहत्यांची शारापोव्हावर टीका
भारताचा क्रिकेट विक्रमवीर सचिन तेंडुलकर कोण, हे मला माहीत नाही, अशी अनभिज्ञता प्रकट करणाऱ्या रशियन टेनिसपटू मारिया शारापोव्हा हिच्यावर सचिनच्या चाहत्यांनी सोशल मीडियावर कडाडून टीका केली आहे.
First published on: 05-07-2014 at 06:41 IST
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Tendulkar fans target sharapova on social media