गेल्या काही महिन्यांपासून ज्याची प्रतीक्षा लागून राहिली होती, त्या नाटय़ाचा पडदा अखेर रविवारी उघडला. देशातील फुटबॉलमध्ये नवी क्रांती घडवू पाहणाऱ्या इंडियन सुपर लीग या फुटबॉल स्पर्धेच्या आठ संघांची आणि मालकांची घोषणा रविवारी करण्यात आली. मास्टर-ब्लास्टर सचिन तेंडुलकर,
सप्टेंबर आणि ऑक्टोबरमध्ये आठ संघांमध्ये होणाऱ्या इंडियन सुपर लीगसाठी निविदा उघडण्यात आल्या. सचिन तेंडुलकर आणि पीव्हीपी व्हेंचर्सने कोची संघाचे हक्क मिळवले आहेत. गांगुलीने स्पॅनिश लीगमध्ये अग्रस्थानी असणाऱ्या अॅटलेटिको माद्रिद तसेच व्यावसायिक हर्षवर्धन नेओटिया, संजीव गोएंका आणि उत्सव पारेख यांनी मिळून कोलकाता फ्रँचायझी मिळवली आहे. बॉलीवूड अभिनेता रणबीर कपूर आणि व्यवसायाने सनदी लेखापाल असलेल्या बिमल पारेख यांनी मुंबई संघाचे हक्क मिळवले आहेत. सलमान खान तसेच वाधवान समूहाचे कपिल वाधवान आणि धीरज वाधवान यांनी पुणे संघाचे हक्क प्राप्त केले आहेत.
‘दन दना दन गोल’ म्हणत आपल्या अभिनयाचा ठसा उमटवणारा अभिनेता जॉन अब्राहमने शिलाँग लजाँग या आय-लीगमधील संघासह गुवाहाटी संघाचे फ्रँचायझी हक्क मिळवले आहेत. डेन नेटवर्कचे समीर मनचंदा यांनी दिल्ली संघाचे तर आयपीएलमधील हैदराबाद सनरायझर्सचे मालकी हक्क असलेल्या सन समूहाने बंगळुरू संघाचे तसेच व्हिडीओकॉन समूहाचे वेणूगोपाल धूत, दत्ताराज साळगांवकर आणि श्रीनिवास डेम्पो यांनी गोवा संघाचे हक्क जिंकले आहेत.
अखिल भारतीय फुटबॉल महासंघाच्या मान्यतेने आयएमजी-रिलायन्स आणि स्टार इंडियाच्या सहकार्याने आयपीएलच्या धर्तीवर होणाऱ्या या स्पर्धेत जगभरातील दिग्गज फुटबॉलपटूंचा समावेश असणार आहे. फ्रान्सचा रॉबर्ट पायरेस, अर्सेनलचा फ्रेड्रिक जंगबेर्ग यांच्यासारख्या फुटबॉलपटूंना ‘आयकॉन’ खेळाडूंचा दर्जा दिला जाणार आहे. आठ संघांचे हक्क मिळवण्यासाठी जवळपास ३०पेक्षा जास्त निविदा आल्या होत्या. भारतीय क्रीडा क्षेत्रातील एखाद्या स्पर्धेला मिळालेला हा अभूतपूर्व प्रतिसाद होता.
‘‘उद्योजक, क्रीडा आणि बॉलीवूडमधून या स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. आता दिल्ली, कोची, गुवाहाटी आणि बंगळुरू ही शहरेही देशातील फुटबॉलच्या केंद्रस्थानी असतील. गेल्या वर्षी आपल्या २४ वर्षांच्या कारकिर्दीची सांगता करणारा सचिन हा कोची संघाचा ब्रँड अॅम्बेसेडर म्हणून काम पाहणार
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा