सचिन तेंडुलकरचे जे क्रिकेटला फार मोठे योगदान आहे, त्यामुळे त्याच्यावर निवृत्तीचा निर्णय लादू नये. हा निर्णय त्यालाच घ्यायला द्यायला हवा, असे मत बीसीसीआयचे वरिष्ठ अधिकारी राजीव शुक्ला यांनी व्यक्त केले आहे.
भारतीय क्रिकेटला सचिनने फार मोठे योगदान दिले आहे, त्याचबरोबर संघाला बरेच वर्षे तो एका चांगल्या भावनेने मार्गदर्शन करत आला आहे. त्यामुळे कोणीही त्याला निवृत्तीबद्दल सांगू नये. जेव्हा सचिनला वाटेल की, आता निवृत्ती घ्यावी त्या वेळी तो हा निर्णय घेईल, असे शुक्ला म्हणाले.
एकदिवसीय क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याचा निर्णय सचिनवर लादण्यात आल्याची चर्चा क्रिकेट वर्तुळात होती. सध्याचा त्याचा फॉर्म हा लौकिकाला साजेसा नसल्याने आता त्याच्या कसोटी क्रिकेटमध्येही निवृत्तीच्या चर्चाना रंग चढताना दिसत आहे, कारण इंग्लंडविरुद्धच्या ४ कसोटी सामन्यांच्या मालिकेमध्ये त्याला फक्त एकच अर्धशतक झळकावता आले होते आणि मालिकेत त्याची सरासरी होती ती ३२ धावांची, पण याबद्दल काहीही काळजी करण्याची गरज नसल्याचे शुक्ला यांनी सांगितले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा