क्रिकेट मैदानावरचा मास्टर ब्लास्टर आपल्या लोकप्रियतेचा सामाजिक बांधिलकीसाठी वापर करणार आहे. चित्रपट दिग्दर्शक आणि अभिनेता फरहान अख्तरने सुरू केलेल्या ‘मर्द’ नावाच्या ‘बलात्कार आणि भेदभावाच्या विरोधात पुरुष’ या अभियानात सचिन तेंडुलकर एका कवितेच्या माध्यमातून महिलांच्या अधिकारांची आणि त्यांच्या समाजिक प्रतिष्ठेची पुरुषांमध्ये जागरुकता निर्माण व्हावी यासाठी प्रयत्न करणार आहे.
‘मर्द’ या फरहान अख्तरच्या संस्थेने म्हटले की, मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने महिलांच्या सामाजिक प्रतिष्ठेला बळकटी आणण्यासाठी प्रयत्नशील आहे. महिलांना समाजात योग्य स्थान आणि स्त्री-पुरुष समान असल्याची भावना पुरूषांमध्ये निर्माण व्हावी व त्याला प्रोत्साहन देण्यासाठी सचिन एक मराठी कवितेचे वाचन करणार आहे. तसेच सचिनची समाजामधील लोकप्रियता पाहता या अभियानात सामिला होण्यासाठी प्रेरित होतील अशी आशाही संस्थेने व्यक्त केली आहे.
सचिन सादर करणारी कविता ही मूळ जावेद अख्तर यांनी रचली आहे. तसेच ही कविता मूळ हिंदीत लिहीली आहे. त्याचबरोबर ही कविता तेलगू, तमिळ, पंजाबी आणि मराठी या भाषांमध्ये कवितेचा अनुवाद करण्यात आला आहे.