‘‘सर्वाधिक २२ ग्रँड स्लॅम जेतेपदांचा स्टेफी ग्राफचा विक्रम मोडण्याची सेरेना विल्यम्समध्ये क्षमता आहे. जर ती पूर्ण तंदुरुस्त असेल, तर ती माझा १८ जेतेपदांचा विक्रम मोडून २० जेतेपदांपर्यंत नक्कीच मजल मारेल. तिच्या झंझावाताला काहीच मर्यादा नाहीत. त्यामुळे ग्राफच्या जेतेपदांचा विक्रमही ती मोडू शकते,’’ असे उद्गार ज्येष्ठ महिला टेनिसपटू मार्टिना नवरातिलोव्हाने काढले.  
२०१३ या वर्षांत सेरेना ८२ सामने खेळली आणि यापैकी केवळ चार सामन्यांत तिचा पराभव झाला. सेरेनाच्या या वर्चस्वाबद्दल बोलताना नवरातिलोव्हा पुढे म्हणते, ‘‘वयाच्या तिशीत आंतरराष्ट्रीय स्तरावर इतक्या प्रचंड वर्चस्वासह खेळ करणे किती कठीण आहे, हे मी समजू शकते. छोटय़ा दुखापतीही त्रासदायक ठरू शकतात. सामने खेळण्यापेक्षा विश्रांती चांगली वाटू लागते. तिशीच्या टप्प्यातही सेरेना कारकिर्दीतील सर्वोत्तम टेनिस खेळते आहे, हे थक्क करणारे आहे.’’ ब्रिस्बेन स्पर्धेत व्हिक्टोरिया अझारेन्काला नमवत सेरेनाने जेतेपद पटकावले. या जेतेपदासह ऑस्ट्रेलियन खुल्या स्पर्धेच्या जेतेपदासाठीही ती प्रबळ दावेदार आहे.

Story img Loader