अॅकापुल्को (मेक्सिको): माजी जगज्जेता खेळाडू राफेल नदालने मेक्सिकन खुल्या टेनिस स्पर्धेत दुसऱ्या फेरीकडे वाटचाल केली. त्याने अर्जेन्टिनाच्या दिएगो श्वार्ट्झमन याच्यावर ६-२, ६-२ असा दणदणीत विजय मिळविला. फ्रेंच स्पर्धा सात वेळा जिंकणाऱ्या नदालने डाव्या गुडघ्याच्या दुखापतीतून सावरल्यानंतर प्रथमच स्पर्धात्मक टेनिसला या स्पर्धेद्वारे सुरुवात केली. दुसरे मानांकन मिळालेल्या नदालनेही दमदार विजय मिळवत थाटात पुनरागमन केले. अन्य सामन्यात, स्पेनच्या डेव्हिड फेररने अन्तानिओ वेईक याच्यावर ६-०, ६-३ अशी सहज मात केली. निकोलस अल्माग्रो याने सेझर रामिरेझ याचा ६-०, ६-१ असा धुव्वा उडवला.
संग्रहित लेख, दिनांक 28th Feb 2013 रोजी प्रकाशित
टेनिस : नदालची दुसऱ्या फेरीत मजल
अॅकापुल्को (मेक्सिको): माजी जगज्जेता खेळाडू राफेल नदालने मेक्सिकन खुल्या टेनिस स्पर्धेत दुसऱ्या फेरीकडे वाटचाल केली. त्याने अर्जेन्टिनाच्या दिएगो श्वार्ट्झमन याच्यावर ६-२, ६-२ असा दणदणीत विजय मिळविला. फ्रेंच स्पर्धा सात वेळा
First published on: 28-02-2013 at 01:12 IST
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Tennis rafael nadal in second round