अमेरिकेची ज्येष्ठ टेनिसपटू सेरेना विल्यम्स हिने स्पर्धात्मक कारकिर्दीतून निवृत्त झाल्यानंतर प्रशिक्षक होण्याचा मनोदय व्यक्त केला आहे.
सेरेना ही ३२ वर्षीय खेळाडू अजूनही सर्वोत्तम कामगिरी करीत असली तरी तिला अनेक वेळा निवृत्त केव्हा होणार असा प्रश्न विचारला जातो. तिने याबाबत अद्याप कोणताही विचार केलेला नाही. मात्र प्रशिक्षकपदाची जबाबदारी स्वीकारण्याबाबत ती उत्सुक आहे. सेरेना व व्हीनस या भगिनी यांनी अनेक सामाजिक प्रकल्प हाती घेतले असून टेनिसद्वारे मिळालेल्या पैशाचा विनियोग या सामाजिक कामासाठी त्या करीत आहेत.
सेरेना म्हणाली, एवढी दीर्घ कारकीर्द करण्याची मला खात्री वाटत नव्हती. मात्र अजूनही माझी कामगिरी चांगली होत असल्यामुळे सध्या तरी खेळातून निवृत्त झाल्यानंतर काय करायचे याचा मी गांभीर्याने विचार केलेला नाही. तथापि अन्य काही ज्येष्ठ खेळाडूंसारखी प्रशिक्षकपदाची जबाबदारी घ्यायला मला आवडेल.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा