जिद्द आणि विजीगीषू वृत्तीच्या जोरावर जागतिक क्रमवारीत अव्वल स्थान गाठलेल्या नोव्हाक जोकोव्हिचचा ‘एकला चलो रे’चा प्रवास संपुष्टात येणार आहे. जोकोव्हिचचा प्रत्येक सामना सुरू असताना मैदानात आवर्जून उपस्थित असणारी जुनी मैत्रीण जेलेना रिस्टिकसह नोव्हाक विवाहबंधनात अडकणार आहे. ‘ट्विटर’ या संकेतस्थळावर जोकोव्हिचने जेलेनाशी वाड:निश्चय झाल्याचे जाहीर केले. ‘‘माझी प्रेयसी आणि भावी पत्नीला भेटा. ती अतिशय आनंदी आहे. तुम्हा सर्वाच्या शुभेच्छांसाठी मन:पूर्वक धन्यवाद!’’.. अशा शब्दांत जोकोव्हिचने आपल्या भावना व्यक्त करताना रिस्टिसह असलेले छायात्रिचही प्रसिद्ध केले आहे. जोकोव्हिचच्या धर्मादाय संस्थेचे संचालकपद रिस्टिक सांभाळते. 

Story img Loader