लॉस कॅबोस (मेक्सिको): ग्रीसच्या अग्रमानांकित स्टेफनोस त्सित्सिपासने ऑस्ट्रेलियाच्या पाचव्या मानांकित अ‍ॅलेक्स डी मिनाऊरला ६-३, ६-४ असे सरळ सेटमध्ये पराभूत करत ’एटीपी’ मेक्सिको खुल्या टेनिस स्पर्धेचे जेतेपद मिळवले. गेल्या १४ महिन्यांतील त्सित्सिपासचे हे पहिलेच विजेतेपद आहे.
ऑस्ट्रेलियन टेनिस स्पर्धेतील उपविजेता असलेल्या त्सित्सिपासने या वर्षी तीन वेळा अंतिम फेरी गाठली. त्याआधी त्याला मेलबर्नमध्ये नोव्हाक जोकोव्हिचकडून पराभूत व्हावे लागले, तर बार्सिलोनामध्ये त्याला कार्लोस अल्कराझने नमवले. त्सित्सिपासचे कारकीर्दीतील हे दहावे ‘एटीपी’ विजेतेपद ठरले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सामन्याला जागतिक क्रमवारीत पाचव्या स्थानी असणाऱ्या त्सित्सिपासने आक्रमक सुरुवात केली व पहिल्या सेटमध्ये वर्चस्व राखत सामन्यात आघाडी घेतली. दुसऱ्या सेटमध्येही त्सित्सिपासने आपली हीच लय कायम राखताना मिनाऊरला पुनरागमन करण्याची कोणतीच संधी दिली नाही.