वर्ल्ड टूर फायनल टेनिस स्पर्धेत लिएण्डर पेस-राडेक स्टेपनेक जोडीने विजयी सलामी दिली. सातव्या मानांकित ऐसाम उल हक कुरेशी आणि जिन ज्युलियन रॉजर जोडीवर पेस-स्टेपनेक जोडीने ६-४, ७-५ अशी मात केली.
ताकदवान परतीचे फटके आणि नेटजवळचा सुरेख खेळ यांच्या जोरावर पेस-स्टेपनेक जोडीने हा विजय साकारला.
 पहिल्या सेटमध्ये स्टेपनेकने एक ब्रेकपॉइंट वाचवला तसेच कुरेशीची सव्‍‌र्हिस भेदत पेस-स्टेपनेक जोडीने पहिला सेट नावावर केला.
दुसऱ्या सेटमध्ये पेस-स्टेपनेक जोडीला संघर्ष करावा लागला. स्टेपनेकने सलग चार गुणांची कमाई करत आघाडी मिळवली. रॉजरची सव्‍‌र्हिस भेदत या जोडीने ६-५ अशी आगेकूच केली.
सहा ब्रेकपॉइंट्स गमावल्याने कुरेशी-रॉजर जोडीला पराभवाला सामारे जावे लागले.
महेश भूपती-रोहन बोपण्णा या भारतीय जोडीचे आव्हान प्राथमिक फेरीतच संपुष्टात आल्याने लिएण्डर पेसकडून अपेक्षा वाढल्या आहेत.    

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Tennis world tour final tennis championship leander paes and radek stepanek win first match