पारंपरिक कसोटी क्रिकेटची नजाकत आजही कायम आहे. कसोटी क्रिकेट हे कायम दहा देशांची मक्तेदारी म्हणून ओळखले जाणार नाही. क्रिकेट हा ऑलिम्पिक खेळ झाल्यास, चीनही क्रिकेटवर गांभीर्याने लक्ष केंद्रित करणार आहे, असे आयसीसीचे नवनियुक्त कार्याध्यक्ष एन. श्रीनिवासन यांनी सांगितले.
क्रिकेट या खेळात चीन कधी लक्ष घालणार, याविषयी बोलताना श्रीनिवासन म्हणाले, ‘‘चीन हे आशियाई क्रिकेट परिषदेचे सदस्य आहेत. क्रिकेटला ऑलिम्पिक मान्यता मिळाल्यावर आम्ही जोमाने मैदानात उतरू. पण तोपर्यंत आम्ही अन्य खेळांवरच लक्ष केंद्रित केले आहे, असे चीन क्रिकेट असोसिएशनच्या पदाधिकाऱ्याने स्पष्ट केले आहे.’’
‘‘आयसीसीचा कार्याध्यक्ष या नात्याने, माझ्या कार्यकाळात मी आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या स्वरूपात बदल करण्याचा प्रयत्न करणार आहे. याबाबत मी आयसीसीशी संलग्न असलेल्या आणि सहयोगी क्रिकेट मंडळांशी मी चर्चा केली आहे. जास्तीत जास्त क्रिकेटच्या स्पर्धा कशा खेळवता येईल, याबाबत आम्ही विचार करत आहोत,’’ असेही श्रीनिवासन यांनी सांगितले.
ते म्हणाले, ‘‘भारतीय क्रिकेटविषयी मी जरा जास्तच आग्रही आहे. ९ जुलैला पहिली कसोटी सुरू होणार आहे. भारतीय संघाने या दौऱ्यात चांगली कामगिरी करावी, असे मला वाटते.’’
कसोटी क्रिकेट दहा देशांची मक्तेदारी नाही -श्रीनिवासन
पारंपरिक कसोटी क्रिकेटची नजाकत आजही कायम आहे. कसोटी क्रिकेट हे कायम दहा देशांची मक्तेदारी म्हणून ओळखले जाणार नाही.
First published on: 07-07-2014 at 01:48 IST
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Test cricket cannot be a 10 member club n srinivasan