पीटीआय, चेन्नई
अपघातानंतर प्रथमच कसोटीत सहभाग नोंदवणारा ऋषभ पंत (१२८ चेंडूंत १०९ धावा) आणि शुभमन गिल (१७६ चेंडूंत नाबाद ११९ धावा) यांच्या शतकी खेळी आणि त्यानंतर गोलंदाजांना क्षेत्ररक्षकांकडून मिळालेल्या सुरेख साथीमुळे भारताने बांगलादेशविरुद्धच्या पहिल्या कसोटी क्रिकेट सामन्यावर घट्ट पकड मिळवली. तिसऱ्या दिवसाचा खेळ अपुऱ्या प्रकाशामुळे थांबवावा लागला, तेव्हा विजयासाठी ५१५ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना बांगलादेश अजून ३५७ धावांनी पिछाडीवर होते. भारताने अडीच दिवसाचा खेळ शिल्लक असताना ४ बाद २८७ धावसंख्येवर दुसरा डाव सोडण्याचा आक्रमक निर्णय घेतला. त्यानंतर बांगलादेशची सुरुवात आश्वासक झाली. मात्र, रविचंद्रन अश्विनच्या (३/६३) फिरकी गोलंदाजीने दिवसअखेरीस बांगलादेशला अडचणीत आणले. बांगलादेशची अवस्था ४ बाद १५८ अशी असून, कर्णधार नजमुल हुसैन शांतो (५१) आणि माजी कर्णधार शाकिब अल हसन (५) खेळपट्टीवर नाबाद होते.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा