कर्णधार चेतेश्वर पुजारा, शिखर धवन, रोहित शर्मा, सुरेश रैना या खेळाडूंची ऑस्ट्रेलियाच्या ‘अ’ संघाविरुद्ध गुरुवारी कसोटीच ठरणार आहे. तीन संघांच्या क्रिकेट मालिकेत भारत व ऑस्ट्रेलिया यांच्या ‘अ’ संघांमध्ये हा सामना येथे होत आहे. ऑस्ट्रेलियाचे भावी क्रिकेटपटू म्हणून नावलौकिक मिळविणाऱ्या खेळाडूंनी या मालिकेतील पहिल्या सामन्यात दक्षिण आफ्रिका ‘अ’ संघावर तीन गडी राखून मात केली होती. भारताचा वरिष्ठ संघ या वर्षांअखेरीस आफ्रिकेचा दौरा करणार आहे. या दौऱ्यासाठी ही मालिका भारताकरिता रंगीत तालीम ठरणार आहे. रोहित शर्मा व शिखर धवन हे दोन फलंदाजच भारताच्या डावाची सुरुवात करण्याची शक्यता आहे. पुजारा व रैना यांच्यासाठी हा सामना महत्त्वाचा आहे. मर्यादित षटकांच्या सामन्यासाठीही आपली उपयुक्तता आहे हे सिद्ध करण्यासाठी पुजाराला अनोखी संधी आहे. झिम्बाब्वेविरुद्धच्या दोन सामन्यात तो अपयशी ठरला होता. गोलंदाजीत ईश्वर पांडे, सिद्धार्थ कौल, महंमद शमी व जयदेव उनाडकत यांच्यावर भारताची भिस्त आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा