भारतासाठी महिलांच्या खेळात काही पदकांची कमाई करणारी पिंकी प्रामाणिक ही पुरूष असल्याचे सिध्द झाले आहे. पश्चिम बंगाल न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या अहवालात महिला धावपटू पिंकी प्रामाणिक पुरुष असल्‍यावर शिक्कामोर्तब झाले असून,  तिच्यावर कोलकाता पोलिसांनी गुन्‍हा दाखल केला आहे.
यावर्षीच्या सुरूवातीला पिंकी प्रामाणिकची गर्लफ्रेंड अनामिका आचार्य हिने पिंकी ही पुरूष असून बलात्काराचा केल्याचा दावा केला होता. त्यानंतर जून महिन्यात पिंकी स्त्री आहे की पुरूष याचा तपास करण्यासाठी सात डॉक्टरांची एक कमिटी स्थापन करण्य़ात आली होती. त्याचा अहवाल असे म्हणतो की, पिंकी ही पुरूष असून संभोग करण्यासा समर्थ आहे. हा अहवाल आता वाटण्यात आला असून लवकरच पिंकीसाठी न्यायालयाची ट्रायल सुरू होईल.  
पिंकीला जून महिन्यात अटक करण्यात आली होती आणि तिला जामीन मिळण्याआधी २५ दिवस कारागृहात घालवले होते. २००६ साली कतार येथे झालेल्या आशियाई स्पर्धेत महिलांच्या ४ बाय ४०० मीटर रिले शर्यतीत पिंकीने सुवर्णपदक आणि त्याच वर्षी मेलबर्न कॉमनवेल्थ गेम्समध्ये रौप्यपदक जिंकले होते.  

Story img Loader