Sanjay Manjrekar on Steve Smith: ऑस्ट्रेलियन क्रिकेट संघाचा माजी कर्णधार आणि जगातील सर्वोतम चार खेळाडूंपैकी एक असलेल्या स्टीव्ह स्मिथने आपल्या संघाला अनेक वेळा कठीण परिस्थितीतून बाहेर काढले आहे. त्यामुळे पुन्हा एकदा अ‍ॅशेस मालिकेतील ओव्हल, लंडन येथे सुरू असलेल्या पाचव्या कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाच्या पहिल्या डावात त्याने संघ संकटात असताना झुंजार फलंदाजी करत अडचणीतून बाहेर काढले. त्याच्या शानदार कामगिरीचे भारताचे माजी खेळाडू संजय मांजरेकर यांनी कौतुक केले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

या सामन्यात इंग्लंडला पहिल्या डावात २८३ धावांत गुंडाळल्यानंतर ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात चांगली सुरुवात केली आणि १ गडी गमावून ९१ धावा केल्या होत्या, पण यादरम्यान जेव्हा एका बाजूने सतत एकामागून एक विकेट पडत राहिल्या त्यानंतर, पण स्मिथने एक बाजू लावून धरत संघाला इंग्लंडच्या धावसंख्येनजीक नेले आणि १२ धावांची नाममात्र का असेना पण आघाडी मिळवून दिली. त्यामुळे शेवटची कसोटी ही सध्या दोलायमान स्थितीत आहे.

हेही वाचा: IND vs WI 2nd ODI: टीम इंडियाला मालिका विजयाची संधी! दुसऱ्या वन डेत संजू सॅमसनला मिळणार संघात स्थान? जाणून घ्या प्लेईंग ११

यानंतर १८५ धावांवर ७ विकेट्स गमावलेल्या ऑस्ट्रेलियासाठी स्टीव्ह स्मिथने शानदार खेळी केली. त्याने कर्णधार पॅट कमिन्ससोबत आठव्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी करत संघाला कठीण परिस्थितीतून बाहेर काढले आणि संघाला सन्मानजनक धावसंख्येपर्यंत नेले. या सामन्याच्या पहिल्या डावात स्मिथने ७१ धावांची खेळी केली आणि तो ऑस्ट्रेलियासाठी सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला.

दुसरे म्हणजे, स्टीव्ह स्मिथच्या या खेळीचे कौतुक करताना माजी भारतीय खेळाडू संजय मांजरेकर यांनी मोठे विधान केले आहे. “स्मिथची चेंडू सोडण्याची, वाचण्याची, डिफेन्स करण्याची क्षमता त्याला आधुनिक फलंदाजांमध्ये सर्वोत्तम बनवते”, असे त्यांनी त्याचे कौतुक करताना म्हटले आहे.

हेही वाचा: IND vs WI 2nd ODI: रोहित शर्मानंतर आता किंग कोहली मोडणार का धोनीचा ‘हा’ विक्रम? जाणून घ्या

स्टीव्ह स्मिथच्या फलंदाजीचे संजय मांजरेकर झाले फॅन

स्टीव्ह स्मिथच्या या खेळीनंतर संजय मांजरेकर यांनी ट्वीट केले आणि लिहिले, “काल त्याला फलंदाजी करताना पाहिले आणि नंतर लक्षात आले की, स्टीव्ह स्मिथमध्ये फक्त ती एक जबरदस्त आणि अद्वितीय अशी शक्ती आहे, जी त्याला आधुनिक फलंदाजांमध्ये महान बनवते. त्याचे डिफेन्स करण्याचे कौशल्य, चेंडू सोडण्याचे तंत्र त्याला इतरांपेक्षा वेगळा ठरवते. बॅट ज्या दिशेने जाते त्या दिशेने त्याचे पाय कुठेही जात नसले तरी चेंडू प्लेट करण्याचे त्याचे काम तो व्यवस्थितपणे करतो. त्याचे फुटवर्क हे फारसे चांगले नाही. मात्र, तरीही त्याला त्याचा काहीही फरक पडत नाही आणि हेच मी त्याला सांगत होतो.” #Ashes”

दुसरीकडे जर या सामन्याबद्दल बोलायचे तर देताना, अ‍ॅशेस मालिकेतील पाचव्या कसोटी सामन्यात दुसऱ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत, इंग्लंडच्या २८३ धावांच्या प्रत्युत्तरात ऑस्ट्रेलियाने आपल्या सर्व विकेट्स २९५ धावांवर गमावल्या आहेत आणि इंग्लंडवर १२ धावांची छोटीशी आघाडी घेतली आहे. त्यामुळे तिसऱ्या दिवसाचा खेळ सुरू झाल्यावर इंग्लंड दुसऱ्या डावात फलंदाजीसाठी उतरेल त्यावेळी त्यांना मोठी धावसंख्या उभारणे आवश्यक आहे.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Thats what makes him great sanjay manjrekar on steve smiths batting prowess avw