भारतीय क्रिकेट कंट्रोल बोर्ड अर्थात बीसीसीआयने इंडियन प्रीमयर लीग म्हणजेच IPL 2018 आयपीएलच्या ११ व्या सिझनचे वेळापत्रक जाहीर केले आहे. ५१ दिवस चालणाऱ्या टुर्नामेंटची सुरुवात ७ एप्रिल २०१८ ला होणार आहे. पहिला आणि अंतिम सामना मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवरच खेळवला जाणार आहे. २७ मे रोजी या टुर्नामेंटमधला अंतिम सामना खेळवण्यात येईल.

पहिला सामना रंगणार आहे तो सध्या चॅम्पियन असलेल्या मुंबई इंडियन आणि दोनवेळा चॅम्पियन ठरलेल्या चेन्नई सुपरकिंग्ज या दोन संघांदरम्यान. पहिला सामनाच अत्यंत चुरशीचा ठरणार आहे यात शंकाच नाही. यात महत्त्वाची बाब म्हणजे एम. एस. धोनी कर्णधार असलेली चेन्नई टीम दोन वर्षांनी पुन्हा मैदानावर असणार आहे. तर मुंबई इंडियन्सचे कर्णधारपद रोहित शर्माकडे असणार आहे.

आयपीएलच्या या मोसमातील १२ सामने हे संध्याकाळी ४ वाजता तर इतर ४८ सामने हे रात्री ८ वाजता खेळवले जाणार आहेत. हे सामने स्टार स्पोर्टस् या चॅनलवर क्रिकेट रसिक पाहू शकणार आहेत.

Story img Loader